S M L

ठाण्यातील तीनही उड्डाणपूल अजून वेटिंगवरच

05 ऑगस्टठाण्यातल्या कोपरी परिसरातला उड्डाणपूल असो किंवा मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ इथले उड्डाणपूल असो हे तीनही उड्डाणपुल बांधण्याचे काम एमएमआरडीएनं हाती घेतलं होतं. पण हे काम आता एमसीआरडीसी पूर्ण करत आहे. पण 2008 साली दिलेले कंत्राट अजूनही पूर्ण होऊ शकलेले नाही. कापुरबावडीच्या उड्डाणपुलासाठी सुरवातीला 133 कोटीचे कंत्राट देण्यात आलं होतं. पण या कामाची 31 जुलैची डेडलाईन उलटून गेल्यानंतरही 50 टक्के काम सुद्धा पुर्ण होउ शकलेलं नाही. यामुळे आता कंत्राटाची रक्कम 159 कोटींपर्यंत गेली. तर उरलेल्या 3 उड्डाणपुलांची रक्कम 44 कोटींवरुन 59 कोटींपर्यंत वाढवण्यात आली. या संदर्भात काँग्रेसचे ठाण्याचे सरचिटणीस विक्रांत चव्हाण यांनी मुख्यंमंत्र्याने पत्र लिहून यासंदर्भात चौकशीची मागणी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 5, 2011 12:18 PM IST

ठाण्यातील तीनही उड्डाणपूल अजून वेटिंगवरच

05 ऑगस्ट

ठाण्यातल्या कोपरी परिसरातला उड्डाणपूल असो किंवा मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ इथले उड्डाणपूल असो हे तीनही उड्डाणपुल बांधण्याचे काम एमएमआरडीएनं हाती घेतलं होतं. पण हे काम आता एमसीआरडीसी पूर्ण करत आहे. पण 2008 साली दिलेले कंत्राट अजूनही पूर्ण होऊ शकलेले नाही.

कापुरबावडीच्या उड्डाणपुलासाठी सुरवातीला 133 कोटीचे कंत्राट देण्यात आलं होतं. पण या कामाची 31 जुलैची डेडलाईन उलटून गेल्यानंतरही 50 टक्के काम सुद्धा पुर्ण होउ शकलेलं नाही. यामुळे आता कंत्राटाची रक्कम 159 कोटींपर्यंत गेली. तर उरलेल्या 3 उड्डाणपुलांची रक्कम 44 कोटींवरुन 59 कोटींपर्यंत वाढवण्यात आली. या संदर्भात काँग्रेसचे ठाण्याचे सरचिटणीस विक्रांत चव्हाण यांनी मुख्यंमंत्र्याने पत्र लिहून यासंदर्भात चौकशीची मागणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2011 12:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close