S M L

नवलेंची याचिका फेटाळली

05 ऑगस्टपवन गांधी ट्रस्ट गैरव्यवहार प्रकरणात मारुती नवले आणखी अडचणीत आले आहेत. एफआयआर रद्द करण्यासाठी नवलेंनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. त्याचबरोबर पोलिसांना चौकशी सुरू ठेवण्याची परवानगीही न्यायालयाने दिली. नवले गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता आहेत. सिंहगड इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा मारुती नवले यांनी 13 एकर जागा हडप केल्याचा आरोप पवन गांधी चॅरिटेबल ट्रस्टने केला. खोटी कागपत्र सादर करून ही जागा हडप करण्यात आलीय. या प्रकरणी गुंडांकडून धमक्या येत असल्याची तक्रार ट्रस्टने पोलिसात केली. 1987 ला पुण्यातला बी.जी. मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या पवन गांधीचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याचे वडिल चैनसुख गांधी आणि त्यांच्या पत्नी गीता गांधी यांनी चॅरीटेबल ट्रस्ट स्थापन केली.पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर पिरंगुट नजिक सुतारवाडी इथं जागा घेऊन शाळा बांधली. सुरवातीला पवन ज्या शाळेत शिकला त्या लॉयला स्कूलनं शाळा चालवली पण नंतर तांत्रिक कारणामुळे ते पुढे चालवू शकले नाहीत. नंतर सिंहगड संस्थेचे मारूती नवले यांनी शाळा चालवायची तयारी दर्शवली आणि मार्च 2008 ते 2011 असा 35 महिन्यांचा करार केला. पण काही दिवसातच पवन गांधी चॅरीटेबल ट्रस्टने घातलेल्या अटी न पाळता मनमानी सुरू केली. चैनसुख गांधी यांनी करार न वाढवता शाळा दुसर्‍या कोणत्यातरी संस्थेला चालवायला देण्याचा निर्णय घेतला. पण नवलेंनी धमकावयला सुरुवात केली. विशेष म्हणजे नवले यांनी 35 महिन्यांचा करार संपायच्या आतच पवन गांधी चॅरीटेबल ट्रस्टच्या सदस्यांना विश्वासात न घेता कराराची मुदत 90 वर्ष वाढवली. एवढंच नाहीतर शाळेच्या बिल्डिंग व्यतिरिक्त रिकाम्या 11.5 एकर जमीन विकत घेतल्याचा खरेदीकरारही केला. ट्रस्टचे विश्वस्त असलेल्या बांधकाम व्यावसायिक रवी बराटे यांनी नवले यांनी विश्वसघात करून खोटी कागदपत्र बनवल्याची तक्रार पौड पोलीस ठाण्यात देऊन फौजदारी कारवाईची मागणी केली.अखेर पोलिसांनी 20 जुलै रोजी तक्रार दाखल केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 5, 2011 12:42 PM IST

नवलेंची याचिका फेटाळली

05 ऑगस्ट

पवन गांधी ट्रस्ट गैरव्यवहार प्रकरणात मारुती नवले आणखी अडचणीत आले आहेत. एफआयआर रद्द करण्यासाठी नवलेंनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. त्याचबरोबर पोलिसांना चौकशी सुरू ठेवण्याची परवानगीही न्यायालयाने दिली. नवले गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता आहेत.

सिंहगड इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा मारुती नवले यांनी 13 एकर जागा हडप केल्याचा आरोप पवन गांधी चॅरिटेबल ट्रस्टने केला. खोटी कागपत्र सादर करून ही जागा हडप करण्यात आलीय. या प्रकरणी गुंडांकडून धमक्या येत असल्याची तक्रार ट्रस्टने पोलिसात केली. 1987 ला पुण्यातला बी.जी. मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या पवन गांधीचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याचे वडिल चैनसुख गांधी आणि त्यांच्या पत्नी गीता गांधी यांनी चॅरीटेबल ट्रस्ट स्थापन केली.

पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर पिरंगुट नजिक सुतारवाडी इथं जागा घेऊन शाळा बांधली. सुरवातीला पवन ज्या शाळेत शिकला त्या लॉयला स्कूलनं शाळा चालवली पण नंतर तांत्रिक कारणामुळे ते पुढे चालवू शकले नाहीत. नंतर सिंहगड संस्थेचे मारूती नवले यांनी शाळा चालवायची तयारी दर्शवली आणि मार्च 2008 ते 2011 असा 35 महिन्यांचा करार केला. पण काही दिवसातच पवन गांधी चॅरीटेबल ट्रस्टने घातलेल्या अटी न पाळता मनमानी सुरू केली.

चैनसुख गांधी यांनी करार न वाढवता शाळा दुसर्‍या कोणत्यातरी संस्थेला चालवायला देण्याचा निर्णय घेतला. पण नवलेंनी धमकावयला सुरुवात केली. विशेष म्हणजे नवले यांनी 35 महिन्यांचा करार संपायच्या आतच पवन गांधी चॅरीटेबल ट्रस्टच्या सदस्यांना विश्वासात न घेता कराराची मुदत 90 वर्ष वाढवली. एवढंच नाहीतर शाळेच्या बिल्डिंग व्यतिरिक्त रिकाम्या 11.5 एकर जमीन विकत घेतल्याचा खरेदीकरारही केला.

ट्रस्टचे विश्वस्त असलेल्या बांधकाम व्यावसायिक रवी बराटे यांनी नवले यांनी विश्वसघात करून खोटी कागदपत्र बनवल्याची तक्रार पौड पोलीस ठाण्यात देऊन फौजदारी कारवाईची मागणी केली.अखेर पोलिसांनी 20 जुलै रोजी तक्रार दाखल केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2011 12:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close