S M L

महाराष्ट्राचा विकास माझ्या हातून होऊ दे - राज ठाकरे

06 ऑगस्टगुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जसा विकास झाला तसाच विकास आपल्या हातून महाराष्ट्रातही होऊ देत असं साकडं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमनाथाला घातलं. आपल्या गुजरात दौर्‍या दरम्यान आज राज ठाकरे यांनी सोमनाथ मंदिराला भेट दिली. सोमनाथाच दर्शन घेऊन त्यांनी या मंदिरात अभिषेकही केला. यावेळी मंदिराच्या परिसरात फिरुन या मंदिराचा इतिहासही त्यांनी जाणून घेतला.गुजरात दौर्‍याच्या चौथ्या दिवशी राज ठाकरे आद्य ज्योतिर्लिगाची शान असलेल्या वेरावळ येथील सोमनाथ मंदिराच्या दर्शनाला गेले. गेल्या तीन दिवसात गुजरातच्या विविध विकसीत प्रकल्पांना भेटी राज ठाकरे भारवून गेले. नॅनो सारखा प्रकल्प महाराष्ट्रात असायला पाहिजे होता अशी खंत ही काल राज ठाकरे यांनी काल व्यक्त केली होती. तसेच त्यांनी मोदी यांची स्तुतीही केली. ते म्हणाले की मोदी सी ई ओ सारखे काम करतात असं लोक म्हणतात, पण मी तर म्हणतो ते सी ई ओ नाहीत तर ते गुजरातचे विश्वस्त म्हणून काम करतात. गुजरात सरकार राबवत असेलल्या साबरमती रिव्हरफ्रंट प्रकल्पाचेही राज यांनी कौतुक केले. आणि हा प्रकल्प त्यांनी आपला गोदा पार्कला नजरेसमोर ठेऊन सुरू केला याचाही त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. आज राज ठाकरे यांनी सोमनाथ मंदिराला भेट दिली. आणि सोमनाथाच दर्शन घेऊन त्यांनी या मंदिरात अभिषेकही केला. तसेच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जसा विकास झाला तसाच विकास आपल्या हातून महाराष्ट्रातही होऊ देत असं साकडं ही राज ठाकरे यांनी सोमनाथाला घातलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 6, 2011 12:43 PM IST

महाराष्ट्राचा विकास माझ्या हातून होऊ दे - राज ठाकरे

06 ऑगस्ट

गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जसा विकास झाला तसाच विकास आपल्या हातून महाराष्ट्रातही होऊ देत असं साकडं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमनाथाला घातलं. आपल्या गुजरात दौर्‍या दरम्यान आज राज ठाकरे यांनी सोमनाथ मंदिराला भेट दिली. सोमनाथाच दर्शन घेऊन त्यांनी या मंदिरात अभिषेकही केला. यावेळी मंदिराच्या परिसरात फिरुन या मंदिराचा इतिहासही त्यांनी जाणून घेतला.

गुजरात दौर्‍याच्या चौथ्या दिवशी राज ठाकरे आद्य ज्योतिर्लिगाची शान असलेल्या वेरावळ येथील सोमनाथ मंदिराच्या दर्शनाला गेले. गेल्या तीन दिवसात गुजरातच्या विविध विकसीत प्रकल्पांना भेटी राज ठाकरे भारवून गेले. नॅनो सारखा प्रकल्प महाराष्ट्रात असायला पाहिजे होता अशी खंत ही काल राज ठाकरे यांनी काल व्यक्त केली होती.

तसेच त्यांनी मोदी यांची स्तुतीही केली. ते म्हणाले की मोदी सी ई ओ सारखे काम करतात असं लोक म्हणतात, पण मी तर म्हणतो ते सी ई ओ नाहीत तर ते गुजरातचे विश्वस्त म्हणून काम करतात. गुजरात सरकार राबवत असेलल्या साबरमती रिव्हरफ्रंट प्रकल्पाचेही राज यांनी कौतुक केले. आणि हा प्रकल्प त्यांनी आपला गोदा पार्कला नजरेसमोर ठेऊन सुरू केला याचाही त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. आज राज ठाकरे यांनी सोमनाथ मंदिराला भेट दिली. आणि सोमनाथाच दर्शन घेऊन त्यांनी या मंदिरात अभिषेकही केला. तसेच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जसा विकास झाला तसाच विकास आपल्या हातून महाराष्ट्रातही होऊ देत असं साकडं ही राज ठाकरे यांनी सोमनाथाला घातलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 6, 2011 12:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close