S M L

बुडालेल्या जहाजातून तेलगळती

07 ऑगस्टमुंबई समुद्रात जलसमाधी मिळालेल्या एमव्ही रॅक जहाजातून मोठ्या प्रमाणावर तेलगळती सुरू झाली आहे. त्यामुळे सागरी पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला. प्रत्येक तासाला तब्बल दीड ते दोन टन तेलगळती होत आहे. कोस्ट गार्डचे समुद्र प्रहरी हे जहाज तेलगळती किती झाली याचे पॅट्रोलिंग करत आहे. तेळगळती आटोक्यात आणण्यासाठी कोस्ट गार्डचे ऑपरेशन पर्यावरण सुरक्षा सुरु आहे. कोस्ट गार्डचे आसीजीएस संकल्प हे जहाजही मोहिमेवर आहे. समुद्रकिना-याच्या सुरक्षेत आणि गस्तीत वाढ करण्यात आली आहे. जुहू किनार्‍यावरचा तेलाचा तवंग काढण्यासाठी राज्य प्रदूषण मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. या तेल गळतीचा मोठा परिणाम सागरी पर्यावरणावर होईल, अशी शक्यता सागरी पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रभावित क्षेत्रात मासेमारीला बंदी घालण्यात आली. लोकांनाही या भागात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मच्छीमार पुन्हा संकटातएम व्ही रॅकमधून सुरु असलेल्या तेलगळतीमुळे मच्छीमार पुन्हा एकदा संकटात सापडले आहे. समुद्राच्या तळाशी असलेल्या रॅकने सागरी पर्यावरणासमोर गंभीर प्रश्न निर्माण केले आहे. या तेल गळतीचा सर्वात जास्त फटका मासेमारीवर व्यवसायाला बसणार आहे. सध्या माशांच्या प्रजननाचा काळ आहे. त्यामुळे भविष्यात माशांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही तेल गळती वेळीच रोखणं गरजेचं आहे. ते रोखलं गेलं नाही तर येणार्‍या काळात मासेमारी व्यवसायावर मोठं संकट उभं राहू शकतं. - मुंबई किनारपट्टी प्रदूषित होण्याची भीती- मासेमारीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता- मँग्रोव्हज नष्ट होण्याची भीती- मँग्रोव्हजच्या पुनरुत्पादनावरही परिणाम- मासे, खेकडे यांसारख्या सागरी जीवांवर परिणामएका वर्षातली दुसरी मोठी तेलगळती- 7 ऑगस्ट 2010 सालीही झाली तेलगळती- दोन जहाजांच्या टकरीमुळे तेलगळती- चित्रा आणि खलिजियाची टक्कर- मँग्रोव्हज आणि मासेमारीवर गंभीर परिणाम

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 7, 2011 09:46 AM IST

बुडालेल्या जहाजातून तेलगळती

07 ऑगस्ट

मुंबई समुद्रात जलसमाधी मिळालेल्या एमव्ही रॅक जहाजातून मोठ्या प्रमाणावर तेलगळती सुरू झाली आहे. त्यामुळे सागरी पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला. प्रत्येक तासाला तब्बल दीड ते दोन टन तेलगळती होत आहे. कोस्ट गार्डचे समुद्र प्रहरी हे जहाज तेलगळती किती झाली याचे पॅट्रोलिंग करत आहे.

तेळगळती आटोक्यात आणण्यासाठी कोस्ट गार्डचे ऑपरेशन पर्यावरण सुरक्षा सुरु आहे. कोस्ट गार्डचे आसीजीएस संकल्प हे जहाजही मोहिमेवर आहे. समुद्रकिना-याच्या सुरक्षेत आणि गस्तीत वाढ करण्यात आली आहे. जुहू किनार्‍यावरचा तेलाचा तवंग काढण्यासाठी राज्य प्रदूषण मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत.

या तेल गळतीचा मोठा परिणाम सागरी पर्यावरणावर होईल, अशी शक्यता सागरी पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रभावित क्षेत्रात मासेमारीला बंदी घालण्यात आली. लोकांनाही या भागात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

मच्छीमार पुन्हा संकटात

एम व्ही रॅकमधून सुरु असलेल्या तेलगळतीमुळे मच्छीमार पुन्हा एकदा संकटात सापडले आहे. समुद्राच्या तळाशी असलेल्या रॅकने सागरी पर्यावरणासमोर गंभीर प्रश्न निर्माण केले आहे. या तेल गळतीचा सर्वात जास्त फटका मासेमारीवर व्यवसायाला बसणार आहे. सध्या माशांच्या प्रजननाचा काळ आहे. त्यामुळे भविष्यात माशांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही तेल गळती वेळीच रोखणं गरजेचं आहे. ते रोखलं गेलं नाही तर येणार्‍या काळात मासेमारी व्यवसायावर मोठं संकट उभं राहू शकतं.

- मुंबई किनारपट्टी प्रदूषित होण्याची भीती- मासेमारीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता- मँग्रोव्हज नष्ट होण्याची भीती- मँग्रोव्हजच्या पुनरुत्पादनावरही परिणाम- मासे, खेकडे यांसारख्या सागरी जीवांवर परिणाम

एका वर्षातली दुसरी मोठी तेलगळती

- 7 ऑगस्ट 2010 सालीही झाली तेलगळती- दोन जहाजांच्या टकरीमुळे तेलगळती- चित्रा आणि खलिजियाची टक्कर- मँग्रोव्हज आणि मासेमारीवर गंभीर परिणाम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 7, 2011 09:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close