S M L

2 जी प्रकरणी अहवालात चिदंबरम यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

07 ऑगस्ट2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणाबद्दल पंतप्रधान कार्यालयावरचा दबाव वाढतच चालला आहे. संसदेच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी या समितीचा एक 276 पानी अहवाल सादर केला. यामध्ये फक्त पंतप्रधानच नाही तर तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. मंत्रीपदी वर्णी लागल्याने लोकलेखा समितीमधून काँग्रेसच्या सदस्या जयंती नटराजन या बाहेर पडल्यात. त्यामुळे समितीत काँग्रेसची सदस्यसंख्या कमी आहे. त्याचवेळी हा अहवाल आल्याने युपीए सरकारपुढच्या अडचणी वाढल्यात. आता बसपा आणि समाजवादी पक्ष काँग्रेसच्या मदतीला पुन्हा धावून येतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहेत. यापूर्वी मुरली मनोहर जोशी यांनी तयार केलेला अहवाल समितीतल्या सदस्यांनी बहुमताच्या आधारावर फेटाळला आहे. दरम्यान जोशी यांनी ठेवलेला ठपका चुकीचा असल्याचं काँग्रेसने म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 7, 2011 10:14 AM IST

2 जी प्रकरणी अहवालात चिदंबरम यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

07 ऑगस्ट

2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणाबद्दल पंतप्रधान कार्यालयावरचा दबाव वाढतच चालला आहे. संसदेच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी या समितीचा एक 276 पानी अहवाल सादर केला. यामध्ये फक्त पंतप्रधानच नाही तर तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

मंत्रीपदी वर्णी लागल्याने लोकलेखा समितीमधून काँग्रेसच्या सदस्या जयंती नटराजन या बाहेर पडल्यात. त्यामुळे समितीत काँग्रेसची सदस्यसंख्या कमी आहे. त्याचवेळी हा अहवाल आल्याने युपीए सरकारपुढच्या अडचणी वाढल्यात. आता बसपा आणि समाजवादी पक्ष काँग्रेसच्या मदतीला पुन्हा धावून येतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहेत. यापूर्वी मुरली मनोहर जोशी यांनी तयार केलेला अहवाल समितीतल्या सदस्यांनी बहुमताच्या आधारावर फेटाळला आहे. दरम्यान जोशी यांनी ठेवलेला ठपका चुकीचा असल्याचं काँग्रेसने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 7, 2011 10:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close