S M L

शासकीय वसतीगृहाच्या कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ

08 ऑगस्टराज्याच्या सामाजिक न्याय विभागातील वसतीगृहाच्या कर्मचार्‍यांवर तटपुंज्या मानधनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. स्वयंपाकी आणि रेक्टर यासारख्या 24 तासाच्या पदावर काम करणार्‍या या कर्मचार्‍याना मानधनाच्या नावाखाली किमान वेतनही मिळत नाही. स्वत:च्याच कर्मचार्‍यांवर अन्याय करणार्‍या सामाजिक न्याय विभागाच्या हा अजब कारभार.अनुदानित वस्तीगृहाच्या चुलीपाशी स्वयंपाक करण्यात बबूबाईंचं आयुष्य गेलं. या चुलीतल्या धुराने बबूबाईचे डोळे पुरते निकामी झाले आहेत. अकोल्याच्या बबूबाईंसारख्या अडीच हजार स्वयपाक्यांच्या हातात मानधम पडते. ते फक्त 3 हजार रुपये. बबूबाईंसारख्या तब्बल 8 हजार 104 कर्मचार्‍यांची यात परवड होते. यात 2 हजार 358 स्वयंपाकी, 2 हजार 388 चौकीदार आणि 2388 रेक्टर यांचा समावेश आहे.अशा तब्बल 8 हजार कर्मचार्‍यांना किमान वेतनही मिळत नाही. मात्र एवढ्या कमी वेतनात त्यांना 24 तास काम करावे लागते. सामाजिक न्याय विभागातल्या या अन्यायाविरोधात ते गेल्या 15 वर्षांपासून लढा देत आहे.या कर्मचार्‍यांना 1966 पर्यंत वेतनश्रेणीनुसार पगार मिळत होता. नंतर मात्र, त्यांचे मानधन करण्यात आलं. सध्या सामाजिक न्याय विभाग यासाठी 26 कोटी रुपये खर्च करतं आहे. मानधनाऐवजी यांना पगार देण्यात आला तर त्यात 30 कोटी रुपयांची वाढ होईल. मात्र या 30 कोटींसाठी यांची परवड कायमच आहे. सामाजिक न्याय विभागाकडूनच आपल्या कर्मचार्‍यांवर सुरु असलेला हा अन्याय कधी थांबणार असा प्रश्न आता विचारला जात आहेत. वसतीगृहातील कर्मचार्‍यांची संख्या- 2 हजार 358 स्वयंपाकी- 2 हजार 388 चौकीदार- 2388 रेक्टर या कर्मचार्‍यांना 1966 पर्यंत वेतनश्रेणीनुसार पगार मिळत होता. नंतर मात्र, त्यांचे मानधन करण्यात आलं. सध्या सामाजिक न्याय विभाग यासाठी 26 कोटी रुपये खर्च करत आहे. मानधनाऐवजी यांना पगार देण्यात आला तर त्यात 30 कोटी रुपयांची वाढ होईल. मात्र, या 30 कोटींसाठी यांची परवड कायमच आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 8, 2011 12:04 PM IST

शासकीय वसतीगृहाच्या कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ

08 ऑगस्ट

राज्याच्या सामाजिक न्याय विभागातील वसतीगृहाच्या कर्मचार्‍यांवर तटपुंज्या मानधनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. स्वयंपाकी आणि रेक्टर यासारख्या 24 तासाच्या पदावर काम करणार्‍या या कर्मचार्‍याना मानधनाच्या नावाखाली किमान वेतनही मिळत नाही. स्वत:च्याच कर्मचार्‍यांवर अन्याय करणार्‍या सामाजिक न्याय विभागाच्या हा अजब कारभार.

अनुदानित वस्तीगृहाच्या चुलीपाशी स्वयंपाक करण्यात बबूबाईंचं आयुष्य गेलं. या चुलीतल्या धुराने बबूबाईचे डोळे पुरते निकामी झाले आहेत. अकोल्याच्या बबूबाईंसारख्या अडीच हजार स्वयपाक्यांच्या हातात मानधम पडते. ते फक्त 3 हजार रुपये. बबूबाईंसारख्या तब्बल 8 हजार 104 कर्मचार्‍यांची यात परवड होते. यात 2 हजार 358 स्वयंपाकी, 2 हजार 388 चौकीदार आणि 2388 रेक्टर यांचा समावेश आहे.

अशा तब्बल 8 हजार कर्मचार्‍यांना किमान वेतनही मिळत नाही. मात्र एवढ्या कमी वेतनात त्यांना 24 तास काम करावे लागते. सामाजिक न्याय विभागातल्या या अन्यायाविरोधात ते गेल्या 15 वर्षांपासून लढा देत आहे.

या कर्मचार्‍यांना 1966 पर्यंत वेतनश्रेणीनुसार पगार मिळत होता. नंतर मात्र, त्यांचे मानधन करण्यात आलं. सध्या सामाजिक न्याय विभाग यासाठी 26 कोटी रुपये खर्च करतं आहे. मानधनाऐवजी यांना पगार देण्यात आला तर त्यात 30 कोटी रुपयांची वाढ होईल. मात्र या 30 कोटींसाठी यांची परवड कायमच आहे. सामाजिक न्याय विभागाकडूनच आपल्या कर्मचार्‍यांवर सुरु असलेला हा अन्याय कधी थांबणार असा प्रश्न आता विचारला जात आहेत.

वसतीगृहातील कर्मचार्‍यांची संख्या

- 2 हजार 358 स्वयंपाकी- 2 हजार 388 चौकीदार- 2388 रेक्टर

या कर्मचार्‍यांना 1966 पर्यंत वेतनश्रेणीनुसार पगार मिळत होता. नंतर मात्र, त्यांचे मानधन करण्यात आलं. सध्या सामाजिक न्याय विभाग यासाठी 26 कोटी रुपये खर्च करत आहे. मानधनाऐवजी यांना पगार देण्यात आला तर त्यात 30 कोटी रुपयांची वाढ होईल. मात्र, या 30 कोटींसाठी यांची परवड कायमच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 8, 2011 12:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close