S M L

तेलगळती रोखणं अशक्य !

08 ऑगस्टमुंबईच्या समुद्रकिनार्‍यावर तेलगळतीचे संकट वाढत चालले आहे. 4 ऑगस्ट रोजी मुंबईजवळ अरबी समुद्रात बुडालेल्या एमव्ही रॅक या जहाजातून ही तेलगळती होत आहे. हे तेल जुहूच्या समुद्रकिनार्‍यापर्यंत आले आहे. जुहू किनार्‍यावर पसरलेला तेलाचा तवंग हा एम व्ही रॅकमधून होणार्‍या गळतीमुळेच आला असं कोस्ट गार्डनं स्पष्ट केले. आतापर्यंत 80 टन तेलाची गळती झाली. या जहाजावर 60 हजार मेट्रीक टन कोळसा आणि 340 टन तेल आहे. हे तेल पूर्णपणे संपल्याशिवाय गळती थांबणार नाही, असं कोस्ट गार्डने स्पष्ट केले. त्यामुळे मासेमारीवर संकट कोसळले आहे. तसेच सागरी जीवानांही मोठा धोका निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच एमव्ही खलिजिया आणि एमएससी चित्रा या दोन जहाजांची टक्कर झाली होती. त्यावेळीही मोठी तेलगळती झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा तीच परिस्थिती ओढवली आहे.नेव्ही आणि कोस्ट गार्डने ही तेलगळती रोखण्यासाठी 'ऑपरेशन पर्यावरण सुरक्षा' सुरू केले. पण हे ऑपरेशन आणखी किती दिवस सुरू राहणार हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. 4 ऑगस्टला सकाळी आठच्या सुमाराला मुंबईच्या समुद्रकिनार्‍यापासून 45 किमी अंतरावर एम व्ही रॅक हे मालवाहू जहाज समुद्रात बुडाले. जहाजावर असलेला 60 हजार मेट्रीक टन कोळसा आणि 290 टन तेल समुद्राच्या तळाशी गेलं. त्यानंतर तीन दिवसांनी रविवारी सकाळी मुंबईच्या जुहू किनार्‍यावर तेलाचे तवंग यायला सुरुवात झाली. जहाज बुडालेल्या ठिकाणी 12 किमीच्या परिसरात तेलाचा तवंग पसरल्याची माहिती नेव्ही आणि कोस्टगार्डने दिली. नेव्ही आणि कोस्ट गार्डने ऑपरेशन पर्यावरण सुरक्षा सुरू केले. कोस्ट गार्डने दिलेल्या माहितीनुसार एम व्ही रॅकमधून होत असलेली तेलगळती मुंबईच्या समुद्र किनार्‍यावर 40 किमी अंतराच्या परिसरात मर्यादित स्वरूपात आहे. पण मुंबईच्या जुहूच्या किनार्‍यावर हे तेल कुठून आले. असा प्रश्न निर्माण झाला. याचं उत्तर आहे मान्सूनमुळे तयार झालेला समुद्राचा प्रवाह.तेलगळतीमुळे मुंबईच्या किनार्‍याला पुन्हा एकदा धोका निर्माण झाला. यामुळे निर्णय झालेली पर्यावरणाची समस्या कशी निस्तरणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एमव्ही रॅक बुडाल्यानंतर तेलगळतीचे संकट ओढवले. पण अशी जहाजं किनार्‍याला लागण्याआधी कोस्ट गार्ड काहीच खबरदारी घेत नाही असं उघड झाले. ऑस्ट्रेलिया, अमेरिकेच्या सागरी हद्दीत अशा जुन्या नादुरुस्त जहाजांना प्रवेश नाही. त्यामुळेच या जहाज कंपन्या भारतासारख्या किनार्‍यांवर ही जहाजं आणतात अशी चर्चा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 8, 2011 04:31 PM IST

तेलगळती रोखणं अशक्य !

08 ऑगस्ट

मुंबईच्या समुद्रकिनार्‍यावर तेलगळतीचे संकट वाढत चालले आहे. 4 ऑगस्ट रोजी मुंबईजवळ अरबी समुद्रात बुडालेल्या एमव्ही रॅक या जहाजातून ही तेलगळती होत आहे. हे तेल जुहूच्या समुद्रकिनार्‍यापर्यंत आले आहे. जुहू किनार्‍यावर पसरलेला तेलाचा तवंग हा एम व्ही रॅकमधून होणार्‍या गळतीमुळेच आला असं कोस्ट गार्डनं स्पष्ट केले.

आतापर्यंत 80 टन तेलाची गळती झाली. या जहाजावर 60 हजार मेट्रीक टन कोळसा आणि 340 टन तेल आहे. हे तेल पूर्णपणे संपल्याशिवाय गळती थांबणार नाही, असं कोस्ट गार्डने स्पष्ट केले. त्यामुळे मासेमारीवर संकट कोसळले आहे.

तसेच सागरी जीवानांही मोठा धोका निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच एमव्ही खलिजिया आणि एमएससी चित्रा या दोन जहाजांची टक्कर झाली होती. त्यावेळीही मोठी तेलगळती झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा तीच परिस्थिती ओढवली आहे.

नेव्ही आणि कोस्ट गार्डने ही तेलगळती रोखण्यासाठी 'ऑपरेशन पर्यावरण सुरक्षा' सुरू केले. पण हे ऑपरेशन आणखी किती दिवस सुरू राहणार हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही.

4 ऑगस्टला सकाळी आठच्या सुमाराला मुंबईच्या समुद्रकिनार्‍यापासून 45 किमी अंतरावर एम व्ही रॅक हे मालवाहू जहाज समुद्रात बुडाले. जहाजावर असलेला 60 हजार मेट्रीक टन कोळसा आणि 290 टन तेल समुद्राच्या तळाशी गेलं.

त्यानंतर तीन दिवसांनी रविवारी सकाळी मुंबईच्या जुहू किनार्‍यावर तेलाचे तवंग यायला सुरुवात झाली. जहाज बुडालेल्या ठिकाणी 12 किमीच्या परिसरात तेलाचा तवंग पसरल्याची माहिती नेव्ही आणि कोस्टगार्डने दिली. नेव्ही आणि कोस्ट गार्डने ऑपरेशन पर्यावरण सुरक्षा सुरू केले.

कोस्ट गार्डने दिलेल्या माहितीनुसार एम व्ही रॅकमधून होत असलेली तेलगळती मुंबईच्या समुद्र किनार्‍यावर 40 किमी अंतराच्या परिसरात मर्यादित स्वरूपात आहे. पण मुंबईच्या जुहूच्या किनार्‍यावर हे तेल कुठून आले. असा प्रश्न निर्माण झाला. याचं उत्तर आहे मान्सूनमुळे तयार झालेला समुद्राचा प्रवाह.

तेलगळतीमुळे मुंबईच्या किनार्‍याला पुन्हा एकदा धोका निर्माण झाला. यामुळे निर्णय झालेली पर्यावरणाची समस्या कशी निस्तरणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एमव्ही रॅक बुडाल्यानंतर तेलगळतीचे संकट ओढवले. पण अशी जहाजं किनार्‍याला लागण्याआधी कोस्ट गार्ड काहीच खबरदारी घेत नाही असं उघड झाले. ऑस्ट्रेलिया, अमेरिकेच्या सागरी हद्दीत अशा जुन्या नादुरुस्त जहाजांना प्रवेश नाही. त्यामुळेच या जहाज कंपन्या भारतासारख्या किनार्‍यांवर ही जहाजं आणतात अशी चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 8, 2011 04:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close