S M L

पंतप्रधानांनी केली कलमाडींची नेमणूक !

08 ऑगस्टआयोजन समितीच्या अध्यक्षपदी सुरेश कलमाडींच्या नेमणुकीवरून वाद सुरू झाला आहे. याबाबत आयबीएन-नेटवर्कला काही महत्त्वाची कागदपत्रं मिळाली आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आग्रहामुळेच कलमाडींची या पदावर नेमणूक झाली असं या कागदपत्रावरून स्पष्ट होते. कॉमनवेल्थ आयोजन समितीच्या अध्यक्षपदी तत्कालीन क्रीडामंत्री सुनील दत्त यांची नेमणूक करावी असा सल्ला पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधानांना दिला होता. 23 नोव्हेंबर 2008 ला हे सल्ला देणारे पत्र लिहिण्यात आलं होते. पण हा सल्ला न ऐकता पंतप्रधानांनी कलमाडींची नेमणूक केली. कलमाडींची नेमणूक ही वाजपेयी सरकारच्या काळात झाली होती. असं गेल्याच आठवड्यात केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांनी म्हटलं होतं. आता आयबीएन नेटवर्कच्या हाती लागलेल्या या पत्रामुळे माकन यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभं राहते. पंतप्रधानांनी कुणाच्या दबावामुळे कलमाडींची नेमणूक केलीय का हाही प्रश्न यामुळे उपस्थित होतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 8, 2011 05:18 PM IST

पंतप्रधानांनी केली कलमाडींची नेमणूक !

08 ऑगस्ट

आयोजन समितीच्या अध्यक्षपदी सुरेश कलमाडींच्या नेमणुकीवरून वाद सुरू झाला आहे. याबाबत आयबीएन-नेटवर्कला काही महत्त्वाची कागदपत्रं मिळाली आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आग्रहामुळेच कलमाडींची या पदावर नेमणूक झाली असं या कागदपत्रावरून स्पष्ट होते.

कॉमनवेल्थ आयोजन समितीच्या अध्यक्षपदी तत्कालीन क्रीडामंत्री सुनील दत्त यांची नेमणूक करावी असा सल्ला पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधानांना दिला होता. 23 नोव्हेंबर 2008 ला हे सल्ला देणारे पत्र लिहिण्यात आलं होते. पण हा सल्ला न ऐकता पंतप्रधानांनी कलमाडींची नेमणूक केली.

कलमाडींची नेमणूक ही वाजपेयी सरकारच्या काळात झाली होती. असं गेल्याच आठवड्यात केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांनी म्हटलं होतं. आता आयबीएन नेटवर्कच्या हाती लागलेल्या या पत्रामुळे माकन यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभं राहते. पंतप्रधानांनी कुणाच्या दबावामुळे कलमाडींची नेमणूक केलीय का हाही प्रश्न यामुळे उपस्थित होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 8, 2011 05:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close