S M L

गोळीबाराचे आर. आर. पाटील यांनी केले समर्थन

09 ऑगस्टमुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर बऊर गावाजवळ शेतकर्‍यांच्या आंदोलनात झालेल्या गोळीबाराचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी समर्थन केले आहे. या गोळीबाराबद्दल आर आर पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. दुपारी साडेबाराच्या सुमाराला रास्ता रोको करणार्‍या आंदोलकांना उठवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. त्यावेळी जमावाने दगडफेक सुरू केली. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला लाठीमार केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून त्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, रबरी गोळ्यांचा वापर केला, हवेत गोळीबार केला. पण त्यानंतरही जमावाने पोलिसांच्या 2 आणि 5 खाजगी गाड्या जाळल्या. त्यामुळे नाइलाजाने पोलिसांना गोळीबार करावा लागला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 9, 2011 06:02 PM IST

गोळीबाराचे आर. आर. पाटील यांनी केले समर्थन

09 ऑगस्ट

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर बऊर गावाजवळ शेतकर्‍यांच्या आंदोलनात झालेल्या गोळीबाराचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी समर्थन केले आहे. या गोळीबाराबद्दल आर आर पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. दुपारी साडेबाराच्या सुमाराला रास्ता रोको करणार्‍या आंदोलकांना उठवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. त्यावेळी जमावाने दगडफेक सुरू केली. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला लाठीमार केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून त्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, रबरी गोळ्यांचा वापर केला, हवेत गोळीबार केला. पण त्यानंतरही जमावाने पोलिसांच्या 2 आणि 5 खाजगी गाड्या जाळल्या. त्यामुळे नाइलाजाने पोलिसांना गोळीबार करावा लागला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2011 06:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close