S M L

झटपट क्रिकेटचा नवा अवतार टी - 10

14नोव्हेंबर मुंबईस्वाती घोसाळकर 20- 20 चा फंडा सुपर हिट झाल्यानंतर आता स्पर्धा आयोजकांनी आणखीन एक पाऊल पुढे टाकायचं ठरवलंय. क्रिकेट जगतात आता टी - 10 च्या क्रिकेटची धूम क्रिकेटप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. ज्यांना क्रिकेट खेळायला मिळत नाही, पण खेळायची हौस असते त्यांच्यासाठी ही स्पर्धा आहे. असं क्रिकेट समालोचक चारू शर्मा सांगतात. गल्ली क्रिकेटच्या या नव्या फॉरमॅटवर स्पर्धा आयोजकही खूष आहेत. एकूण पाच टीममध्ये या मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. 20-20 आणि आयपीएलनंतर आता हा नवीन फंडा किती हिट ठरतो यावर भारतीय क्रिकेट बोर्डाचंही लक्ष असेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2008 07:47 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2008 07:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close