S M L

महापालिकेच्या सव्वा लाख कर्मचार्‍यांची संपाची हाक

09 ऑगस्टमुंबई महापालिकेचे सव्वा लाख कर्मचारी आज रात्री 9 पासून संपावर जाण्याची शक्यता आहे. सहावा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी गेले कित्येक दिवस कामगार मागणी करत आहे. पण हा वेतन आयोग लागू होण्यात दिरंगाई होत असल्याने शरद राव आणि इतर कामगार संघटनांनी संपाची हाक दिली. यामुळे महापालिकेच्या सर्व सेवा ठप्प होऊ शकतात. आयुक्तांबरोबरची पहिली बैठक फिस्कटल्याने संपाच्या भुमिकेवर आपण ठाम राहणार असल्याचे कर्मचार्‍यांचे म्हणणं आहे. आता पुढची बैठक चार वाजल्यापासून सुरु झाली. तर या संपात सहभागी न होण्याचे आवाहने आयुक्त सुबोधकुमार यांनी केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 9, 2011 12:06 PM IST

महापालिकेच्या सव्वा लाख कर्मचार्‍यांची संपाची हाक

09 ऑगस्ट

मुंबई महापालिकेचे सव्वा लाख कर्मचारी आज रात्री 9 पासून संपावर जाण्याची शक्यता आहे. सहावा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी गेले कित्येक दिवस कामगार मागणी करत आहे. पण हा वेतन आयोग लागू होण्यात दिरंगाई होत असल्याने शरद राव आणि इतर कामगार संघटनांनी संपाची हाक दिली.

यामुळे महापालिकेच्या सर्व सेवा ठप्प होऊ शकतात. आयुक्तांबरोबरची पहिली बैठक फिस्कटल्याने संपाच्या भुमिकेवर आपण ठाम राहणार असल्याचे कर्मचार्‍यांचे म्हणणं आहे. आता पुढची बैठक चार वाजल्यापासून सुरु झाली. तर या संपात सहभागी न होण्याचे आवाहने आयुक्त सुबोधकुमार यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2011 12:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close