S M L

भाजपचा दिल्लीत राडा ; संसदेत हल्लाबोल

09 ऑगस्टकॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी आज संसदेत आणि संसदेच्या बाहेर विरोधकांनी सरकारला घेरलं. कलमाडींची नेमणूक सोनिया गांधींनी केली. आणि क्रीडा मंत्री अजय माकन यांचे मधू कोडांशी आर्थिक संबंध आहेत. असे सनसनाटी आरोप भाजपने केले. त्यामुळे लोकसभेतील वातावरण चांगलंच तापले. तर शीला दीक्षित यांचा राजीनामा मागणारे भाजपचे कार्यकर्ते संसदेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. त्यामुळे संसद परिसरातील वातावरण तणावाचं झालं होतं. कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्याप्रकरणी भाजपने आज संसदेच्या आत आणि बाहेर सरकारला चांगलंच धारेवर धरलं. राज्यसभेत विरोधी पक्षनेते अरूण जेटली आणि यशवंत सिन्हांनी मोर्चा सांभाळला. कॉमनवेल्थ खेळांच्या आयोजन समितीच्या अध्यक्षपदी सुरेश कलमाडींच्या निवडीवर सरकारने स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला. पण यावर अरुण जेटलींनी जोरदार हल्ला चढवला. क्रीडा मंत्री अजय माकन यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्तावावार चर्चा करताना जेटलींनी सोनिया गांधींचंही नाव कलमाडी नेमणूक प्रकरणात ओढले. आयोजन समितीच्या अध्यक्षपदी सुनील दत्त यांची नियुक्ती करण्याचा सल्ला पंतप्रधान कार्यालयाने. पंतप्रधान डॉ.सिंग यांना दिला होता. पण त्यांनी या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून कलमाडींची नेमणूक केली. आयबीएन नेटवर्कने दाखवलेला हा पुरावा जेटलींनी सभागृहात मांडला. पण लोकसभेतील वातावरण राज्यसभेपेक्षा जास्त तापलं होते. क्रीडा मंत्री अजय माकन यांचे संबंध झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्याशी असल्याचा आरोप यशवंतर सिन्हांनी केला. पण गदारोळ झाल्यानंतर हा भाग संसदेच्या रेकॉर्डमधून वगळण्यात आला.संसदेत वातावरण तापले असताना बाहेरची परिस्थिती वेगळी नव्हती. भाजपच्या युवा मोर्चांच्या. भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलनाला हिंसक वळण लागलं. कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स ओलांडून संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. त्यात अनेक कार्यकर्ते जखमी झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 9, 2011 05:51 PM IST

भाजपचा दिल्लीत राडा ; संसदेत हल्लाबोल

09 ऑगस्ट

कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी आज संसदेत आणि संसदेच्या बाहेर विरोधकांनी सरकारला घेरलं. कलमाडींची नेमणूक सोनिया गांधींनी केली. आणि क्रीडा मंत्री अजय माकन यांचे मधू कोडांशी आर्थिक संबंध आहेत. असे सनसनाटी आरोप भाजपने केले. त्यामुळे लोकसभेतील वातावरण चांगलंच तापले. तर शीला दीक्षित यांचा राजीनामा मागणारे भाजपचे कार्यकर्ते संसदेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. त्यामुळे संसद परिसरातील वातावरण तणावाचं झालं होतं.

कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्याप्रकरणी भाजपने आज संसदेच्या आत आणि बाहेर सरकारला चांगलंच धारेवर धरलं. राज्यसभेत विरोधी पक्षनेते अरूण जेटली आणि यशवंत सिन्हांनी मोर्चा सांभाळला. कॉमनवेल्थ खेळांच्या आयोजन समितीच्या अध्यक्षपदी सुरेश कलमाडींच्या निवडीवर सरकारने स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला. पण यावर अरुण जेटलींनी जोरदार हल्ला चढवला. क्रीडा मंत्री अजय माकन यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्तावावार चर्चा करताना जेटलींनी सोनिया गांधींचंही नाव कलमाडी नेमणूक प्रकरणात ओढले.

आयोजन समितीच्या अध्यक्षपदी सुनील दत्त यांची नियुक्ती करण्याचा सल्ला पंतप्रधान कार्यालयाने. पंतप्रधान डॉ.सिंग यांना दिला होता. पण त्यांनी या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून कलमाडींची नेमणूक केली. आयबीएन नेटवर्कने दाखवलेला हा पुरावा जेटलींनी सभागृहात मांडला. पण लोकसभेतील वातावरण राज्यसभेपेक्षा जास्त तापलं होते.

क्रीडा मंत्री अजय माकन यांचे संबंध झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्याशी असल्याचा आरोप यशवंतर सिन्हांनी केला. पण गदारोळ झाल्यानंतर हा भाग संसदेच्या रेकॉर्डमधून वगळण्यात आला.

संसदेत वातावरण तापले असताना बाहेरची परिस्थिती वेगळी नव्हती. भाजपच्या युवा मोर्चांच्या. भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलनाला हिंसक वळण लागलं. कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स ओलांडून संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. त्यात अनेक कार्यकर्ते जखमी झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2011 05:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close