S M L

भारत - इंग्लंड तिसरी टेस्टवर दंगलीचे सावट

09 ऑगस्टभारत आणि इंग्लंडदरम्यानची तिसरी टेस्ट मॅच बुधवारपासून सुरु होत आहे. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर ही मॅच खेळवली जाणार आहेत. पण या मॅचवर दंगलीचे सावट आहे. दोन दिवसांपूर्वी लंडनमध्ये सुरु झालेली दंगल आता बर्मिंगहॅम शहरात पोहोचली. सोमवारी रात्रीच 100 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या टेस्टसाठी दोन्ही टीमचे खेळाडू बर्मिंगहॅममध्ये पोहोचले. सोमवारी रात्री भारतीय टीमचे काही सदस्य बाहेर जेवायला गेलेले असताना दंगलीची बातमी आली. खेळाडूंना सुरक्षितपणे हॉटेलमध्ये आणण्यात आले. पण आज दोन्ही टीमचे खेळाडू सरावासाठी मैदानात उतरले. अर्थात त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. दरम्यान तिसरी टेस्ट नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 9, 2011 05:59 PM IST

भारत - इंग्लंड तिसरी टेस्टवर दंगलीचे सावट

09 ऑगस्ट

भारत आणि इंग्लंडदरम्यानची तिसरी टेस्ट मॅच बुधवारपासून सुरु होत आहे. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर ही मॅच खेळवली जाणार आहेत. पण या मॅचवर दंगलीचे सावट आहे. दोन दिवसांपूर्वी लंडनमध्ये सुरु झालेली दंगल आता बर्मिंगहॅम शहरात पोहोचली. सोमवारी रात्रीच 100 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या टेस्टसाठी दोन्ही टीमचे खेळाडू बर्मिंगहॅममध्ये पोहोचले. सोमवारी रात्री भारतीय टीमचे काही सदस्य बाहेर जेवायला गेलेले असताना दंगलीची बातमी आली. खेळाडूंना सुरक्षितपणे हॉटेलमध्ये आणण्यात आले. पण आज दोन्ही टीमचे खेळाडू सरावासाठी मैदानात उतरले. अर्थात त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. दरम्यान तिसरी टेस्ट नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2011 05:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close