S M L

आयबीएन लोकमतच्या दृश्यांची दखल

10 ऑगस्टमुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मावळ येथे झालेल्या गोळीबार प्रकरणाची बित्तंबातमी आम्ही तुमच्यापर्यंत काल पोचवलीच विधानपरिषदेत पांडुरंग फुंडकर यांनी आयबीएन लोकमतने केलेल्या मावळ गोळीबार प्रकरणाचा हवाला देत मागणी केली की पोलीससुध्दा गाड्यांची तोडफोड करत होते. ही दृश्यं आयबीएन लोकमतवर सर्वांनी पाहिलेली आहेत, त्यामुळे त्याचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी फुंडकर यांनी केली. तर यावरच बोलताना काँग्रेसच्या भाई जगताप यांनी पोलिसांवर गावकर्‍यांनी केलेल्या हल्ल्याचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली.पवना धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी पाण्याची पाइपलाईन टाकण्यात येत आहे. या पाइपलाईनला स्थानिक शेतकर्‍यांचा विरोध आहे. त्याविरोधात मावळ तालुक्यात ठिकठिकाणी सभा आणि रास्ता रोको करण्यात आले. पहाटेपासूनच या आंदोलनाला सुरुवात झाली. बऊर गावाजवळही रास्ता रोको करण्यात आला. दुपारी हे आंदोलन चिघळले आणि त्याला हिंसक वळण लागले. पाईपलाईनचा विरोध म्हणून शेतकर्‍यांनी अनेक ठिकाणी जाळपोळ केली. पोलिसांच्या गाड्याही पेटवण्यात आल्या. एसटी बस तसेच खासगी गाड्या जाळण्यात आल्या. यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. यात तीन शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. या सर्व घटनाक्रमाचे फूटेज काल आयबीएन लोकमतने प्रसिध्द केले. या फूटेजमध्ये पोलिसांनी यामार्गाने जाणार्‍या मालवाहू ट्रक, आणि एका मारूती कारची तोडफोड करत असताना स्पष्ट दिसत होते. याच फूटेजची दखल घेत पांडुरंग फुंडकर यांनी चौकशीची मागणी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 10, 2011 10:58 AM IST

आयबीएन लोकमतच्या दृश्यांची दखल

10 ऑगस्ट

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मावळ येथे झालेल्या गोळीबार प्रकरणाची बित्तंबातमी आम्ही तुमच्यापर्यंत काल पोचवलीच विधानपरिषदेत पांडुरंग फुंडकर यांनी आयबीएन लोकमतने केलेल्या मावळ गोळीबार प्रकरणाचा हवाला देत मागणी केली की पोलीससुध्दा गाड्यांची तोडफोड करत होते.

ही दृश्यं आयबीएन लोकमतवर सर्वांनी पाहिलेली आहेत, त्यामुळे त्याचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी फुंडकर यांनी केली. तर यावरच बोलताना काँग्रेसच्या भाई जगताप यांनी पोलिसांवर गावकर्‍यांनी केलेल्या हल्ल्याचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली.

पवना धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी पाण्याची पाइपलाईन टाकण्यात येत आहे. या पाइपलाईनला स्थानिक शेतकर्‍यांचा विरोध आहे. त्याविरोधात मावळ तालुक्यात ठिकठिकाणी सभा आणि रास्ता रोको करण्यात आले. पहाटेपासूनच या आंदोलनाला सुरुवात झाली. बऊर गावाजवळही रास्ता रोको करण्यात आला. दुपारी हे आंदोलन चिघळले आणि त्याला हिंसक वळण लागले. पाईपलाईनचा विरोध म्हणून शेतकर्‍यांनी अनेक ठिकाणी जाळपोळ केली. पोलिसांच्या गाड्याही पेटवण्यात आल्या. एसटी बस तसेच खासगी गाड्या जाळण्यात आल्या.

यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. यात तीन शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. या सर्व घटनाक्रमाचे फूटेज काल आयबीएन लोकमतने प्रसिध्द केले. या फूटेजमध्ये पोलिसांनी यामार्गाने जाणार्‍या मालवाहू ट्रक, आणि एका मारूती कारची तोडफोड करत असताना स्पष्ट दिसत होते. याच फूटेजची दखल घेत पांडुरंग फुंडकर यांनी चौकशीची मागणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 10, 2011 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close