S M L

पहिली गोळी आंदोलकाने झाडली - आर. आर.पाटील

10 ऑगस्टमावळमध्ये झालेल्या गोळीबाराची हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत यासंदर्भात घोषणा केली. दरम्यान गृहमंत्र्यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. बऊरमध्ये लोकांना अडवण्याचा प्रयत्न करत असताना पहिल्यांदा एका आंदोलकाने गोळी झाडली. एका खाजगी गाडीतून ही फायरिंग करण्यात आली. आणि फायरिंग करणारा फरार झाला, अशी तक्रार एका व्यक्तीने केल्याचे पाटील यांनी सभागृहात सांगितले. एका खाजगी पिस्तुलातली गोळीसुद्धा घटनास्थळी सापडल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. हीच गोळी एका आंदोलकाला लागल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं. ही गोळी फॉरेंसिक लॅबमध्ये आता तपासली जाणार आहे. या आंदोलनात भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे हे आंदोलन कुणाच्या सांगण्यावरून चिघळण्यात आलं की काय याचीही चौकशी केली जाणार असल्याचे आर. आर. पाटील यांनी सांगितले. आर. आर. पाटील यांच्या उत्तरानंतर संतप्त विरोधकांनी सरकारविरोधात पुन्हा घोषणाबाजी केली. मावळचे भाजपाचे आमदार संजय भेगडे यांनी तर अध्यक्षासमोरील राजदंड उचलला. या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज दोनदा 10-15 मिनिटासाठी तहकूब करावा लागला. शिवसेनेचे खाजदार गजानन बाबर यांनी ही बंदिस्त पाईपलाईन व्हावी अशी मागणी 2002 साली सरकारकडे केली होती. आता ते वेगळी भूमिका घेऊन दुटप्पी भुमिका घेत असल्याचा आरोप आर. आर पाटील यांनी विधानसभेत केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 10, 2011 11:51 AM IST

पहिली गोळी आंदोलकाने झाडली - आर. आर.पाटील

10 ऑगस्ट

मावळमध्ये झालेल्या गोळीबाराची हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत यासंदर्भात घोषणा केली. दरम्यान गृहमंत्र्यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. बऊरमध्ये लोकांना अडवण्याचा प्रयत्न करत असताना पहिल्यांदा एका आंदोलकाने गोळी झाडली.

एका खाजगी गाडीतून ही फायरिंग करण्यात आली. आणि फायरिंग करणारा फरार झाला, अशी तक्रार एका व्यक्तीने केल्याचे पाटील यांनी सभागृहात सांगितले. एका खाजगी पिस्तुलातली गोळीसुद्धा घटनास्थळी सापडल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. हीच गोळी एका आंदोलकाला लागल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं. ही गोळी फॉरेंसिक लॅबमध्ये आता तपासली जाणार आहे.

या आंदोलनात भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे हे आंदोलन कुणाच्या सांगण्यावरून चिघळण्यात आलं की काय याचीही चौकशी केली जाणार असल्याचे आर. आर. पाटील यांनी सांगितले. आर. आर. पाटील यांच्या उत्तरानंतर संतप्त विरोधकांनी सरकारविरोधात पुन्हा घोषणाबाजी केली.

मावळचे भाजपाचे आमदार संजय भेगडे यांनी तर अध्यक्षासमोरील राजदंड उचलला. या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज दोनदा 10-15 मिनिटासाठी तहकूब करावा लागला. शिवसेनेचे खाजदार गजानन बाबर यांनी ही बंदिस्त पाईपलाईन व्हावी अशी मागणी 2002 साली सरकारकडे केली होती. आता ते वेगळी भूमिका घेऊन दुटप्पी भुमिका घेत असल्याचा आरोप आर. आर पाटील यांनी विधानसभेत केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 10, 2011 11:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close