S M L

याचं उत्तर द्यावं लागेल !

10 ऑगस्टमंगळवारी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मावळ येथे शेतकर्‍यांच्या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात 3 आंदोलक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. आयबीएन लोकमतच्या हाती आणखी एक व्हिडिओ फूटेज लागले. यामध्ये पोलिसांनी थेट शेतकर्‍यांवर गोळीबार केला आहे. शेतकर्‍यांचा पाठलाग करून गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी खुद्द वाहनांची तोडफोड केली. एकीकडे राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील पहिली गोळी ही आंदोलकाने झाडली असं म्हणतं आहे. पण दृष्यांमध्ये पोलिसांनी ज्याप्रकारे फायरिंग केली आहे त्यामुळे पाटील यांचा दावा या दृष्यांनी फोल ठरवला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे राज्यभरातून टीका होतं आहे. याचं उत्तर सरकारला द्यावे लागेल अशी मागणी सर्व स्तारातून केली जात आहे. आज गोळीबारात ठार झालेल्याचे तिघांचे मृतदेह नातेवाईकांना देण्यात आले. आज संध्याकाळी या तिघांवर अत्यसंस्कार झाला. कालच्या धुमश्चक्रीनंतर आता मावळमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. मावळ आणि परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. मात्र कालच्या गोळीबारानंतर शेतकर्‍यांनमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. आयबीएन लोकमतने काल सर्वात प्रथम घटनास्थळी झालेल्या धुमश्चक्रीचे व्हिडिओ फूटेज प्रसिध्द केले. या फूटेजमध्ये पोलिसांनी यामार्गाने जाणार्‍या मालवाहू ट्रक, आणि एका मारूती कारची तोडफोड करत असताना स्पष्ट दिसत आहे. याच फूटेजची दखल घेत पांडुरंग फुंडकर यांनी चौकशीची मागणी केली.दरम्यान आज या प्रकरणाची मावळमध्ये झालेल्या गोळीबाराची हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत यासंदर्भात घोषणा केली. दरम्यान गृहमंत्र्यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. बऊरमध्ये लोकांना अडवण्याचा प्रयत्न करत असताना पहिल्यांदा एका आंदोलकाने गोळी झाडली. एका खाजगी गाडीतून ही फायरिंग करण्यात आली. या आंदोलनात भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे हे आंदोलन कुणाच्या सांगण्यावरून चिघळण्यात आलं की काय याचीही चौकशी केली जाणार असल्याचे आर. आर. पाटील यांनी सांगितले. आर. आर. पाटील यांच्या उत्तरानंतर संतप्त विरोधकांनी सरकारविरोधात पुन्हा घोषणाबाजी केली.तिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विधान परिषदेत शिवसेनेवर हल्लाबोल करत खासदार गजानन बाबर यांच्यावर गंभीर आरोप केला. अजित पवार म्हणतात, 'गजानन बाबर यांनी 2002 मध्ये आमदार असताना आपल्याला एक पत्र पाठवलं होतं. आणि बंदिस्त जलवाहिनीतून पाणी आणावे. तसेच सर्व नगरसेवकांनी सहकार्य करावे असं आवाहन पत्रातून केलं होतं. आता हेच बाबर आपल्याला विरोध करत आहेत. रिलायन्सच्या पाइपलाईनला तेव्हा शिवसेनेनं विरोध केला नाही. आता सरकार पाइपलाईन टाकत असताना त्याला विरोध केला जातोय.' उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या या गंभीर आरोपानंतर विरोधक चांगलेच संतापले .एकीकडे पवना धरणाचं पेटलेलं पाणी शांत झालेलं नसताना आता या गोळीबारावरुन राजकारण सुरू झालं. या प्रकरणी भाजप आणि सेना खासदारांनी हा मुद्दा विधानसभा उपस्थित केला. निरपराध शेतकर्‍यांवर गोळीबार करणार्‍या महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्याची मागणी गोपिनाथ मुंडे यांनी केली. या मुद्यावर लोकसभेच कामकाज दिवसभर चालू देणार नाही असा इशाराही भाजप-सेनेच्या खासदांरानी दिला. तर विधानसभेत ही विरोधकांनी गोंधळ घातला. गोळीबार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी खडसे यांनी केली. तसेच मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि जखमींना 50 हजारांची मदत देण्याची मागणीही केली. या गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज सुरूवातीला 20 मिनिटासाठी आणि नंतर अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 10, 2011 03:11 PM IST

याचं उत्तर द्यावं लागेल !

10 ऑगस्ट

मंगळवारी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मावळ येथे शेतकर्‍यांच्या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात 3 आंदोलक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. आयबीएन लोकमतच्या हाती आणखी एक व्हिडिओ फूटेज लागले. यामध्ये पोलिसांनी थेट शेतकर्‍यांवर गोळीबार केला आहे.

शेतकर्‍यांचा पाठलाग करून गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी खुद्द वाहनांची तोडफोड केली. एकीकडे राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील पहिली गोळी ही आंदोलकाने झाडली असं म्हणतं आहे. पण दृष्यांमध्ये पोलिसांनी ज्याप्रकारे फायरिंग केली आहे त्यामुळे पाटील यांचा दावा या दृष्यांनी फोल ठरवला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे राज्यभरातून टीका होतं आहे. याचं उत्तर सरकारला द्यावे लागेल अशी मागणी सर्व स्तारातून केली जात आहे.

आज गोळीबारात ठार झालेल्याचे तिघांचे मृतदेह नातेवाईकांना देण्यात आले. आज संध्याकाळी या तिघांवर अत्यसंस्कार झाला. कालच्या धुमश्चक्रीनंतर आता मावळमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. मावळ आणि परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. मात्र कालच्या गोळीबारानंतर शेतकर्‍यांनमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.

आयबीएन लोकमतने काल सर्वात प्रथम घटनास्थळी झालेल्या धुमश्चक्रीचे व्हिडिओ फूटेज प्रसिध्द केले. या फूटेजमध्ये पोलिसांनी यामार्गाने जाणार्‍या मालवाहू ट्रक, आणि एका मारूती कारची तोडफोड करत असताना स्पष्ट दिसत आहे. याच फूटेजची दखल घेत पांडुरंग फुंडकर यांनी चौकशीची मागणी केली.

दरम्यान आज या प्रकरणाची मावळमध्ये झालेल्या गोळीबाराची हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत यासंदर्भात घोषणा केली. दरम्यान गृहमंत्र्यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. बऊरमध्ये लोकांना अडवण्याचा प्रयत्न करत असताना पहिल्यांदा एका आंदोलकाने गोळी झाडली. एका खाजगी गाडीतून ही फायरिंग करण्यात आली.

या आंदोलनात भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे हे आंदोलन कुणाच्या सांगण्यावरून चिघळण्यात आलं की काय याचीही चौकशी केली जाणार असल्याचे आर. आर. पाटील यांनी सांगितले. आर. आर. पाटील यांच्या उत्तरानंतर संतप्त विरोधकांनी सरकारविरोधात पुन्हा घोषणाबाजी केली.

तिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विधान परिषदेत शिवसेनेवर हल्लाबोल करत खासदार गजानन बाबर यांच्यावर गंभीर आरोप केला. अजित पवार म्हणतात, 'गजानन बाबर यांनी 2002 मध्ये आमदार असताना आपल्याला एक पत्र पाठवलं होतं. आणि बंदिस्त जलवाहिनीतून पाणी आणावे. तसेच सर्व नगरसेवकांनी सहकार्य करावे असं आवाहन पत्रातून केलं होतं.

आता हेच बाबर आपल्याला विरोध करत आहेत. रिलायन्सच्या पाइपलाईनला तेव्हा शिवसेनेनं विरोध केला नाही. आता सरकार पाइपलाईन टाकत असताना त्याला विरोध केला जातोय.' उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या या गंभीर आरोपानंतर विरोधक चांगलेच संतापले .एकीकडे पवना धरणाचं पेटलेलं पाणी शांत झालेलं नसताना आता या गोळीबारावरुन राजकारण सुरू झालं.

या प्रकरणी भाजप आणि सेना खासदारांनी हा मुद्दा विधानसभा उपस्थित केला. निरपराध शेतकर्‍यांवर गोळीबार करणार्‍या महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्याची मागणी गोपिनाथ मुंडे यांनी केली. या मुद्यावर लोकसभेच कामकाज दिवसभर चालू देणार नाही असा इशाराही भाजप-सेनेच्या खासदांरानी दिला.

तर विधानसभेत ही विरोधकांनी गोंधळ घातला. गोळीबार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी खडसे यांनी केली. तसेच मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि जखमींना 50 हजारांची मदत देण्याची मागणीही केली. या गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज सुरूवातीला 20 मिनिटासाठी आणि नंतर अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 10, 2011 03:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close