S M L

आठवलेंचाही 'आरक्षण'ला हिरवा कंदील

11 ऑगस्टआरक्षण सिनेमातील काही आक्षेपार्ह दृश्यं बदलायला निर्माते प्रकाश झा तयार आहेत. त्यामुळे आता हा सिनेमा रिलीज व्हायला आक्षेप नाही, असं आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. आरक्षणच्या मुद्यावर आज आठवले आणि प्रकाश झा यांनी पत्रकार परिषद घेतली. झा यांच्याशी चर्चा केल्यानंतर आमच्या शंका दूर झाल्या आहेत. सिनेमात किरकोळ बदल करण्याची तयारी झा यांनी दाखवली. त्यामुळे केवळ विरोधासाठी विरोध करणार नसल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. तर आठवले यांच्या सुचनेप्रमाणे काही बदल करायला तयार असल्याचं झा यांनी स्पष्ट केलं. आणि ठरल्याप्रमाणे उद्या सिनेमा सगळीकडे रिलीज होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 11, 2011 10:34 AM IST

आठवलेंचाही 'आरक्षण'ला हिरवा कंदील

11 ऑगस्ट

आरक्षण सिनेमातील काही आक्षेपार्ह दृश्यं बदलायला निर्माते प्रकाश झा तयार आहेत. त्यामुळे आता हा सिनेमा रिलीज व्हायला आक्षेप नाही, असं आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. आरक्षणच्या मुद्यावर आज आठवले आणि प्रकाश झा यांनी पत्रकार परिषद घेतली.

झा यांच्याशी चर्चा केल्यानंतर आमच्या शंका दूर झाल्या आहेत. सिनेमात किरकोळ बदल करण्याची तयारी झा यांनी दाखवली. त्यामुळे केवळ विरोधासाठी विरोध करणार नसल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. तर आठवले यांच्या सुचनेप्रमाणे काही बदल करायला तयार असल्याचं झा यांनी स्पष्ट केलं. आणि ठरल्याप्रमाणे उद्या सिनेमा सगळीकडे रिलीज होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 11, 2011 10:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close