S M L

बेवारस जहाजाचा वर्षभरापासून मुक्काम ; कोस्ट गार्डचे दुर्लक्ष

अजित मांढरे, मुंबई11 ऑगस्टमुंबईत भाऊच्या धक्क्याजवळ 4 नॉटिकल मैल अंतरावर एक जहाज आहे. या जहाजावर आहेत फक्त 2 माणसं. एक स्वयंपाकी, दुसरा जनरल सुपरवायझर. काही दिवस, काही आठवडे नव्हे, तर गेले तब्बल 12 महिने जहाज नांगर टाकून पाण्यात उभं आहे. ही एक कार्गो शिप आहे. आणि भरकटून कुठल्याही मालवाहू जहाजाला धडकू शकते. मंुबई कोस्टगार्ड, सागरी पोलीस आणि नेव्हीच्या ढिसाळ कारभारामुळे भविष्यात मंुबईतील समुद्रात मोठा अपघात होऊ शकतो.एम.व्ही.विस्डम, एम.व्ही.पवित, एम.व्ही.रॅक या भरकटलेल्या जहाजांनी मुंबईच्या समुद्रकिनार्‍यावर येऊन आपली समुद्रकिनारा किती सुरक्षित हे सिध्द करून दाखवले आहे. एका मागून एक येणार्‍या जहाजांनी कोस्ट गार्ड, सागरी पोलीस आणि नेव्हीच्या ढिसाळ कारभारवर नांगर टाकले आहे. मुंबईतील भाऊच्या धक्क्याजवळ 4 नॉटिकल मैल अंतरावर एक कार्गो शिप गेल्यावर्ष भरापासून नांगर टाकून आहे. या जहाजाची अवस्था मोडकळीस आली आहे. न्यायालयानेही या जहाजाला भंगारात काढले असताना ही जहाजाच्या मालकाने मात्र हरकत घेतली आहे. या विशाल जहाजावर फक्त दोनच कर्मचारी आहे. एक स्वयंपाक करणारा आणि दुसरा सुपरवायझर. पण गेल्या वर्षभरात या दोघांवर कित्येक वेळा उपासमारीची वेळ आली आहे. आता प्रश्न हा उपस्थित होत आहे की वर्षभरात कोस्ट गार्ड, सागरी पोलिसांनी या जहाजावर कारवाई का केली नाही ? सागरी सुरक्षेसाठी कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांनी याकडे दुर्लक्ष का केले ? उद्या जर या जहाजामुळे एखादा मोठा अपघात झाला तर याला जबाबदार कोण असणार ? आता सरकारने वेळीच दखल घेऊन योग्य ती पाऊल उचलावी.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 11, 2011 05:39 PM IST

बेवारस जहाजाचा वर्षभरापासून मुक्काम ; कोस्ट गार्डचे दुर्लक्ष

अजित मांढरे, मुंबई

11 ऑगस्ट

मुंबईत भाऊच्या धक्क्याजवळ 4 नॉटिकल मैल अंतरावर एक जहाज आहे. या जहाजावर आहेत फक्त 2 माणसं. एक स्वयंपाकी, दुसरा जनरल सुपरवायझर. काही दिवस, काही आठवडे नव्हे, तर गेले तब्बल 12 महिने जहाज नांगर टाकून पाण्यात उभं आहे. ही एक कार्गो शिप आहे. आणि भरकटून कुठल्याही मालवाहू जहाजाला धडकू शकते. मंुबई कोस्टगार्ड, सागरी पोलीस आणि नेव्हीच्या ढिसाळ कारभारामुळे भविष्यात मंुबईतील समुद्रात मोठा अपघात होऊ शकतो.

एम.व्ही.विस्डम, एम.व्ही.पवित, एम.व्ही.रॅक या भरकटलेल्या जहाजांनी मुंबईच्या समुद्रकिनार्‍यावर येऊन आपली समुद्रकिनारा किती सुरक्षित हे सिध्द करून दाखवले आहे. एका मागून एक येणार्‍या जहाजांनी कोस्ट गार्ड, सागरी पोलीस आणि नेव्हीच्या ढिसाळ कारभारवर नांगर टाकले आहे. मुंबईतील भाऊच्या धक्क्याजवळ 4 नॉटिकल मैल अंतरावर एक कार्गो शिप गेल्यावर्ष भरापासून नांगर टाकून आहे.

या जहाजाची अवस्था मोडकळीस आली आहे. न्यायालयानेही या जहाजाला भंगारात काढले असताना ही जहाजाच्या मालकाने मात्र हरकत घेतली आहे. या विशाल जहाजावर फक्त दोनच कर्मचारी आहे. एक स्वयंपाक करणारा आणि दुसरा सुपरवायझर. पण गेल्या वर्षभरात या दोघांवर कित्येक वेळा उपासमारीची वेळ आली आहे.

आता प्रश्न हा उपस्थित होत आहे की वर्षभरात कोस्ट गार्ड, सागरी पोलिसांनी या जहाजावर कारवाई का केली नाही ? सागरी सुरक्षेसाठी कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांनी याकडे दुर्लक्ष का केले ? उद्या जर या जहाजामुळे एखादा मोठा अपघात झाला तर याला जबाबदार कोण असणार ? आता सरकारने वेळीच दखल घेऊन योग्य ती पाऊल उचलावी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 11, 2011 05:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close