S M L

साठेंचा मृत्यू पोलिसांच्या ताब्यात नसताना झाला - कर्णिक

11 ऑगस्टमावळमध्ये पोलीस गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या मोरेश्वर साठे प्रकरणी पोलिसांनी आता स्पष्टीकरण दिले आहे. मोरेश्वर साठेंचा मृत्यू पोलिसांच्या ताब्यात असताना झाला नाही असा दावा मावळच्या एसपी संदीप कर्णिक यांनी केला. साठेंना ताब्यात घ्यायचा पोलिसांनी प्रयत्न केला होता पण जमावाने पोलिसांवर हल्ला केल्यामुळे साठे पळून गेले असा खुलासा पुणे ग्रामीणचे एसपी संदीप कर्णिक यांनी केला. तसेच या आंदोलकांवर पूर्वनियोजित कटाचा गुन्हा दाखल करणार आहे. आंदोलनाच्यावेळी 6 अधिकार्‍यांनी 51 गोळ्या झाडल्या. या अधिकार्‍यांना स्पष्टिकरण द्यावे लागणार असून चूक आढळल्यास पोलिसांवर कारवाई करु असं स्पष्टीकरणसुद्धा त्यांनी दिले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 11, 2011 12:07 PM IST

साठेंचा मृत्यू पोलिसांच्या ताब्यात नसताना झाला - कर्णिक

11 ऑगस्ट

मावळमध्ये पोलीस गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या मोरेश्वर साठे प्रकरणी पोलिसांनी आता स्पष्टीकरण दिले आहे. मोरेश्वर साठेंचा मृत्यू पोलिसांच्या ताब्यात असताना झाला नाही असा दावा मावळच्या एसपी संदीप कर्णिक यांनी केला. साठेंना ताब्यात घ्यायचा पोलिसांनी प्रयत्न केला होता पण जमावाने पोलिसांवर हल्ला केल्यामुळे साठे पळून गेले असा खुलासा पुणे ग्रामीणचे एसपी संदीप कर्णिक यांनी केला. तसेच या आंदोलकांवर पूर्वनियोजित कटाचा गुन्हा दाखल करणार आहे. आंदोलनाच्यावेळी 6 अधिकार्‍यांनी 51 गोळ्या झाडल्या. या अधिकार्‍यांना स्पष्टिकरण द्यावे लागणार असून चूक आढळल्यास पोलिसांवर कारवाई करु असं स्पष्टीकरणसुद्धा त्यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 11, 2011 12:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close