S M L

इंग्लंडचे वर्चस्व ; 232 धावांची आघाडी

11 ऑगस्टएजबॅस्टन टेस्टच्या दुसर्‍याच दिवशी इंग्लंडने टेस्टवर वर्चस्व मिळवले आहे. दुसर्‍या दिवस अखेर इंग्लंडने 456 रन केलेत ते फक्त 3 विकेट गमावतं. त्यांच्याकडे 232 रनची भक्कम आघाडी आहे. पहिल्या इनिंगमध्ये त्यांच्या प्रत्येक बॅट्समनने रन केले. अँड्र्यू स्ट्राऊस आणि ऍलिस्टर कूक यांनी 186 रनची सलामी टीमला करुन दिली. स्ट्राऊस 87 रनवर आऊट झाला. पण त्याची कसर कूकने भरुन काढली. सीरिजमधील दुसरी सेंच्युरी त्याने ठोकली. इयन बेल 34 रन करुन आऊट झाला. पण केविन पीटरसनने आक्रमक खेळत 63 रन केले. इंग्लंडचे बॅट्समन इतके सहज खेळत होते की धोणीला फिल्डिंग कशी लावायची हे समजत नव्हतं. आणि फोर तर बेमालूमपणे जात होते. भरीस भर म्हणून द्रविड आणि श्रीसंतने सोपे कॅचही सोडले. त्यातल्या त्यात प्रवीण कुमारने बॅट्समनना लगाम घातला. आणि 2 विकेटही मिळवल्या. पण ईशांत आणि श्रीसंतची चांगलीच धुलाई झाली. अमित मिश्राही प्रभाव पाडू शकला नाही. आता ही टेस्ट वाचवण्यासाठी भारतीय टीमला चांगलीच मेहनत करावी लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 11, 2011 12:31 PM IST

इंग्लंडचे वर्चस्व ; 232 धावांची आघाडी

11 ऑगस्ट

एजबॅस्टन टेस्टच्या दुसर्‍याच दिवशी इंग्लंडने टेस्टवर वर्चस्व मिळवले आहे. दुसर्‍या दिवस अखेर इंग्लंडने 456 रन केलेत ते फक्त 3 विकेट गमावतं. त्यांच्याकडे 232 रनची भक्कम आघाडी आहे. पहिल्या इनिंगमध्ये त्यांच्या प्रत्येक बॅट्समनने रन केले. अँड्र्यू स्ट्राऊस आणि ऍलिस्टर कूक यांनी 186 रनची सलामी टीमला करुन दिली. स्ट्राऊस 87 रनवर आऊट झाला. पण त्याची कसर कूकने भरुन काढली. सीरिजमधील दुसरी सेंच्युरी त्याने ठोकली. इयन बेल 34 रन करुन आऊट झाला.

पण केविन पीटरसनने आक्रमक खेळत 63 रन केले. इंग्लंडचे बॅट्समन इतके सहज खेळत होते की धोणीला फिल्डिंग कशी लावायची हे समजत नव्हतं. आणि फोर तर बेमालूमपणे जात होते. भरीस भर म्हणून द्रविड आणि श्रीसंतने सोपे कॅचही सोडले. त्यातल्या त्यात प्रवीण कुमारने बॅट्समनना लगाम घातला. आणि 2 विकेटही मिळवल्या. पण ईशांत आणि श्रीसंतची चांगलीच धुलाई झाली. अमित मिश्राही प्रभाव पाडू शकला नाही. आता ही टेस्ट वाचवण्यासाठी भारतीय टीमला चांगलीच मेहनत करावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 11, 2011 12:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close