S M L

कोल्हापुरात भोसले नाट्यगृहाकडे वितरकांनी फिरवली पाठ

11 ऑगस्टकोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहात अवाजवी भाडेवाढ केल्याने नाट्य निर्माते, नाट्य वितरक आणि नाट्यप्रेमीतून संताप व्यक्त केला जातं आहे. सध्या नाट्यगृहाच्या भाड्यासह एसी आणि विजेचे बिल धरुन एका प्रयोगासाठी अकरा हजार रुपये नाट्य वितरकांना द्यावे लागत आहेत. महाराष्ट्रातल्या कोणत्याही नाट्यगृहापेक्षा हे भाडं दुप्पटीने जास्त आहे. या नाट्यगृहाची तिकीट खिडकी गळणारी आहे. जनरेटरची सोय नाही,नाट्यगृहाला एअर टाईट दारे नाहीत,स्पॉट,सेटिंग आणि लेव्हलचीही सोय नाही. तरीही नाट्यवितरकांना अवाजवी भाडे द्यावे लागत असल्याने अनेक नाट्य वितरकांनी पाठ फिरवली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 11, 2011 08:59 AM IST

कोल्हापुरात भोसले नाट्यगृहाकडे वितरकांनी फिरवली पाठ

11 ऑगस्ट

कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहात अवाजवी भाडेवाढ केल्याने नाट्य निर्माते, नाट्य वितरक आणि नाट्यप्रेमीतून संताप व्यक्त केला जातं आहे. सध्या नाट्यगृहाच्या भाड्यासह एसी आणि विजेचे बिल धरुन एका प्रयोगासाठी अकरा हजार रुपये नाट्य वितरकांना द्यावे लागत आहेत. महाराष्ट्रातल्या कोणत्याही नाट्यगृहापेक्षा हे भाडं दुप्पटीने जास्त आहे. या नाट्यगृहाची तिकीट खिडकी गळणारी आहे. जनरेटरची सोय नाही,नाट्यगृहाला एअर टाईट दारे नाहीत,स्पॉट,सेटिंग आणि लेव्हलचीही सोय नाही. तरीही नाट्यवितरकांना अवाजवी भाडे द्यावे लागत असल्याने अनेक नाट्य वितरकांनी पाठ फिरवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 11, 2011 08:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close