S M L

मावळ गोळीबारप्रकरणी 6 पोलीस निलंबित

11 ऑगस्टमावळ गोळीबार प्रकरणी अखेर सहा पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. या पोलीस कर्मचार्‍यांवर वाहनांची तोडफोड करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली अशी माहिती पुणे ग्रामीणचे एस.पी. संदीप कर्णिक यांनी दिली. मुंबई पुणे हायवेवर बऊरगावाजवळ पवना धरणातून बंदिस्त पाईपलाईन टाकण्यास विरोध करणार्‍या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला 9 ऑगस्टला हिंसक वळण लागलं होतं. मावळमध्ये झालेल्या आंदोलनात शेतकर्‍यांसोबतच पोलिसांनाही तोडफोड केली होती. त्याप्रकरणी सहा पोलीस कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. बऊरजवळ आंदोलनाच्या ठिकाणी उभ्या असलेल्या गाड्या पोलिसांनीच फोडल्या होत्या. शिवाय लोकांवर गोळीबारही केला होता. त्यात तिघांचा जीव गेला होता. पोलिसांनी कसा लाठीचार्ज केला आणि तोडफोड कशी केली याची दृश्यं आयबीएन-लोकमतने सर्वात पहिल्यांदा दाखवली होती. त्यानंतर या पोलिसांवर कारवाई झाली. तोडफोडीप्रककरणी पाच लोकांनाही अटक करण्यात आली. मारूती गरदाळे, रवी गरदाळे, शेखर दळवी, नितिन दळवी आणि किरण वाघमारे अशी त्यांची नावं आहेत. तर जवळपास 1200 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 11, 2011 02:14 PM IST

मावळ गोळीबारप्रकरणी 6 पोलीस निलंबित

11 ऑगस्ट

मावळ गोळीबार प्रकरणी अखेर सहा पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. या पोलीस कर्मचार्‍यांवर वाहनांची तोडफोड करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली अशी माहिती पुणे ग्रामीणचे एस.पी. संदीप कर्णिक यांनी दिली.

मुंबई पुणे हायवेवर बऊरगावाजवळ पवना धरणातून बंदिस्त पाईपलाईन टाकण्यास विरोध करणार्‍या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला 9 ऑगस्टला हिंसक वळण लागलं होतं. मावळमध्ये झालेल्या आंदोलनात शेतकर्‍यांसोबतच पोलिसांनाही तोडफोड केली होती. त्याप्रकरणी सहा पोलीस कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

बऊरजवळ आंदोलनाच्या ठिकाणी उभ्या असलेल्या गाड्या पोलिसांनीच फोडल्या होत्या. शिवाय लोकांवर गोळीबारही केला होता. त्यात तिघांचा जीव गेला होता. पोलिसांनी कसा लाठीचार्ज केला आणि तोडफोड कशी केली याची दृश्यं आयबीएन-लोकमतने सर्वात पहिल्यांदा दाखवली होती. त्यानंतर या पोलिसांवर कारवाई झाली.

तोडफोडीप्रककरणी पाच लोकांनाही अटक करण्यात आली. मारूती गरदाळे, रवी गरदाळे, शेखर दळवी, नितिन दळवी आणि किरण वाघमारे अशी त्यांची नावं आहेत. तर जवळपास 1200 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 11, 2011 02:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close