S M L

साठेंचं एन्काऊंटर की गोळीबारात मृत्यू ?

11 ऑगस्टमावळ गोळीबार प्रकरणाचे तीव्र पडसाद अजून उमटत आहेत. या गोळीबारात तीन आंदोलकाचा मृत्यू झाला. त्यातल्या मोरेश्वर साठे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन मग त्याच्यावर गोळ्या झाडल्या, असा आरोप केला जात आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मोरेश्वर याला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी मान्य केले. पण तो आंदोलकांमध्ये मिसळल्यानंतर, गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचा दावा केला.पवनेचं पाणी पेटले. मंगळवारी झालेल्या पोलिसांच्या गोळीबारात तीन जणांचा बळी गेला. त्यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कारही झाले. पण त्यांच्या मृत्यूवरून वाद सुरू झाला. पोलीस आणि सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. मंगळवारच्या आंदोलनात शिवणे गावातल्या मोरेश्वर साठे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याला कस्टडीतच गोळ्या झाडल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाच्या ठिकाणाला भेट दिली. मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केलं. पोलिसांच्या ताब्यात असलेली व्यक्ती गोळीबारात कशी ठार होते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मोरेश्वर याला ताब्यात घेण्यात आलं होतं हे पोलिसांनी मान्य केले. पण, ताब्यात घेतल्यानंतर मोरेश्वर सुटून पुन्हा जमावात घुसला, त्यावेळी झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला.आंदोलनाच्या ठिकाणी 6 पोलीस अधिकारी होते, आणि त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून एकूण 51 गोळ्या झाडल्या गेल्या. त्यातल्या तीन गोळ्यांनी आंदोलकांचा जीव घेतला. मुळात पोलिसांनी इतका टोकाचा निर्णय का घेतला हासुद्धा एक प्रश्न आहे. मावळच्या आंदोलनावरून सरकार आणि विरोधी पक्षांमधली चिखलफेक सुरूच राहील, पोलिसांची चौकशीही होईल. पण आंदोलनात ज्यांच्या कुटुंबाचा आधारच हरवला आहे. त्यांना न्याय कसा मिळणार हा खरा प्रश्न आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 11, 2011 05:36 PM IST

साठेंचं एन्काऊंटर की गोळीबारात मृत्यू ?

11 ऑगस्ट

मावळ गोळीबार प्रकरणाचे तीव्र पडसाद अजून उमटत आहेत. या गोळीबारात तीन आंदोलकाचा मृत्यू झाला. त्यातल्या मोरेश्वर साठे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन मग त्याच्यावर गोळ्या झाडल्या, असा आरोप केला जात आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मोरेश्वर याला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी मान्य केले. पण तो आंदोलकांमध्ये मिसळल्यानंतर, गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचा दावा केला.

पवनेचं पाणी पेटले. मंगळवारी झालेल्या पोलिसांच्या गोळीबारात तीन जणांचा बळी गेला. त्यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कारही झाले. पण त्यांच्या मृत्यूवरून वाद सुरू झाला. पोलीस आणि सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. मंगळवारच्या आंदोलनात शिवणे गावातल्या मोरेश्वर साठे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याला कस्टडीतच गोळ्या झाडल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाच्या ठिकाणाला भेट दिली. मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केलं. पोलिसांच्या ताब्यात असलेली व्यक्ती गोळीबारात कशी ठार होते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मोरेश्वर याला ताब्यात घेण्यात आलं होतं हे पोलिसांनी मान्य केले. पण, ताब्यात घेतल्यानंतर मोरेश्वर सुटून पुन्हा जमावात घुसला, त्यावेळी झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला.

आंदोलनाच्या ठिकाणी 6 पोलीस अधिकारी होते, आणि त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून एकूण 51 गोळ्या झाडल्या गेल्या. त्यातल्या तीन गोळ्यांनी आंदोलकांचा जीव घेतला. मुळात पोलिसांनी इतका टोकाचा निर्णय का घेतला हासुद्धा एक प्रश्न आहे. मावळच्या आंदोलनावरून सरकार आणि विरोधी पक्षांमधली चिखलफेक सुरूच राहील, पोलिसांची चौकशीही होईल. पण आंदोलनात ज्यांच्या कुटुंबाचा आधारच हरवला आहे. त्यांना न्याय कसा मिळणार हा खरा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 11, 2011 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close