S M L

परराष्ट्रमंत्री गोंधळले, अन् पाक कैद्यासाठी पुटपुटले !

11 ऑगस्टएका आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर राज्यसभेत निवेदन देताना परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा आज गोंधळून गेले. अजमेर तुरुंगात असलेला पाकिस्तानी कैदी डॉक्टर चिश्ती याच्या सुटकेबद्दल एका खासदाराने प्रश्न विचारला. त्यावर चिश्ती हा पाकिस्तानातील जेलमध्ये असल्याचे कृष्णा यांनी सांगितले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी चिश्तीला दया दाखवावी असं आवाहन पाकिस्तानला केल्याचंही ते म्हणाले. कृष्णा यांना या प्रकरणाची माहितीच नसल्याचे आढळून आल्यावर पंतप्रधान मनमोहन सिंग यांना हस्तक्षेप करावा लागला. चिश्तीच्या सुटकेप्रकरणी राजस्थान सरकारशी संपर्क साधण्याची सूचना आपण चिदंबरम यांना केल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 11, 2011 05:56 PM IST

परराष्ट्रमंत्री गोंधळले, अन् पाक कैद्यासाठी पुटपुटले !

11 ऑगस्ट

एका आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर राज्यसभेत निवेदन देताना परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा आज गोंधळून गेले. अजमेर तुरुंगात असलेला पाकिस्तानी कैदी डॉक्टर चिश्ती याच्या सुटकेबद्दल एका खासदाराने प्रश्न विचारला. त्यावर चिश्ती हा पाकिस्तानातील जेलमध्ये असल्याचे कृष्णा यांनी सांगितले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी चिश्तीला दया दाखवावी असं आवाहन पाकिस्तानला केल्याचंही ते म्हणाले. कृष्णा यांना या प्रकरणाची माहितीच नसल्याचे आढळून आल्यावर पंतप्रधान मनमोहन सिंग यांना हस्तक्षेप करावा लागला. चिश्तीच्या सुटकेप्रकरणी राजस्थान सरकारशी संपर्क साधण्याची सूचना आपण चिदंबरम यांना केल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 11, 2011 05:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close