S M L

अपहरत इराणचे जहाज नौदलाच्या ताब्यात

15 ऑगस्टइराणच्या आखातातून अपहरण करण्यात आलेलं मालवाहू जहाज एम.व्ही. नफीस-1 ची यशस्वी सुटका करण्यात भारतीय नौदलाला यश आले. आयएनएस म्हैसूर या युध्दनौकैच्या आणि दोन हेलिकॉप्टरच्या साहाय्याने 14 ऑगस्टला यशस्वी कारवाई करण्यात आली. जहाजातील सर्व अपहरणकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. 12 ऑगस्टला नौदलाच्या टेहळणी विमानांना इराणचा राष्ट्रध्वज असणारे हे जहाज संशयास्पद स्थितीत आढळून आलं होतं. त्या दिवसापासून नौदलाचे या जहाजावर लक्ष होते. जुलै महिन्यात इराणच्या चाह बहारजवळून हे जहाज निघाल होतं. कारवाईच्या दरम्यान नौदलाच्या मार्कोसने या जहाजात प्रवेश केला. दोन AK 47 रायफल, आणि पिस्तूल जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यां चाच्यांची चौकशी सुरु आहे. सध्या या जहाजाला टो करुन पोरबंदर इथ नेण्यात येत आहे. पोरबंदर इथ या जहाज आणि अटक करण्यात आलेल्या चाच्यांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 15, 2011 01:25 PM IST

अपहरत इराणचे जहाज नौदलाच्या ताब्यात

15 ऑगस्ट

इराणच्या आखातातून अपहरण करण्यात आलेलं मालवाहू जहाज एम.व्ही. नफीस-1 ची यशस्वी सुटका करण्यात भारतीय नौदलाला यश आले. आयएनएस म्हैसूर या युध्दनौकैच्या आणि दोन हेलिकॉप्टरच्या साहाय्याने 14 ऑगस्टला यशस्वी कारवाई करण्यात आली. जहाजातील सर्व अपहरणकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.

12 ऑगस्टला नौदलाच्या टेहळणी विमानांना इराणचा राष्ट्रध्वज असणारे हे जहाज संशयास्पद स्थितीत आढळून आलं होतं. त्या दिवसापासून नौदलाचे या जहाजावर लक्ष होते. जुलै महिन्यात इराणच्या चाह बहारजवळून हे जहाज निघाल होतं. कारवाईच्या दरम्यान नौदलाच्या मार्कोसने या जहाजात प्रवेश केला.

दोन AK 47 रायफल, आणि पिस्तूल जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यां चाच्यांची चौकशी सुरु आहे. सध्या या जहाजाला टो करुन पोरबंदर इथ नेण्यात येत आहे. पोरबंदर इथ या जहाज आणि अटक करण्यात आलेल्या चाच्यांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 15, 2011 01:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close