S M L

मुंबईत अण्णांच्या समर्थकांचा एल्गार

16 ऑगस्टमुंबईतही जनलोकपालच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद लाभला. तरुणाबरोबरच ज्येष्ठ नागरिकही सकाळपासूनच आझाद मैदानात जमायला सुरुवात झाली. त्याआधी सीएसटी स्थानकाबाहेर इंडिया अगेन्स्ट करप्शनचे स्वयंसेवक लोकपालबिलाच्या आंदोलनात सहभागी होण्याकरता आवाहन करत असल्याचं पाहायला मिळाले. आझाद मैदानावर लोक जमायला लागल्यावर पोलिसांनी त्यांना अटकाव केला. तेव्हा आझाद मैदानाच्या समोरच्या रस्त्यावर तरुणांनी ठिय्या आंदोलन केलं. पोलीस आंदोलनालाही विरोध करु लागल्यावर सुरु झालं जेलभरो आंदोलन. अण्णांच्या समर्थनार्थ आझाद मैदानात सह्यांची मोहीम राबवण्यात आली. संध्याकाळपर्यंत तीन हजार लोकांनी सह्या करुन आपला पाठिंबा दर्शवला. माटुंग्यातही पोलीस स्टेशनबाहेर आंदोलक आक्रमक झाले होते. अण्णांच्या समर्थनासाठी उद्यापासून गिरणी कामगारही रस्त्यावर उतरणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 16, 2011 04:17 PM IST

मुंबईत अण्णांच्या समर्थकांचा एल्गार

16 ऑगस्ट

मुंबईतही जनलोकपालच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद लाभला. तरुणाबरोबरच ज्येष्ठ नागरिकही सकाळपासूनच आझाद मैदानात जमायला सुरुवात झाली. त्याआधी सीएसटी स्थानकाबाहेर इंडिया अगेन्स्ट करप्शनचे स्वयंसेवक लोकपालबिलाच्या आंदोलनात सहभागी होण्याकरता आवाहन करत असल्याचं पाहायला मिळाले.

आझाद मैदानावर लोक जमायला लागल्यावर पोलिसांनी त्यांना अटकाव केला. तेव्हा आझाद मैदानाच्या समोरच्या रस्त्यावर तरुणांनी ठिय्या आंदोलन केलं. पोलीस आंदोलनालाही विरोध करु लागल्यावर सुरु झालं जेलभरो आंदोलन.

अण्णांच्या समर्थनार्थ आझाद मैदानात सह्यांची मोहीम राबवण्यात आली. संध्याकाळपर्यंत तीन हजार लोकांनी सह्या करुन आपला पाठिंबा दर्शवला. माटुंग्यातही पोलीस स्टेशनबाहेर आंदोलक आक्रमक झाले होते. अण्णांच्या समर्थनासाठी उद्यापासून गिरणी कामगारही रस्त्यावर उतरणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 16, 2011 04:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close