S M L

राळेगणसिद्धीमध्ये साखळी उपोषण ; तरूणांनी काढली प्रभात फेरी

17 ऑगस्टअण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीमध्ये आज दुसर्‍या दिवशीही राळेगण बंद पुकारण्यात आला असून आजही इथं उस्फूर्त आंदोलन सुरू आहेत. अण्णांच्या समर्थनार्थ यादवबाबा मंदिर परिसरात लाक्षणिक उपोषणा आज दुसर्‍या दिवशीही सुरू आहे. तसेच तरूणांनी प्रभात फेरी काढली. वन्दे मातरम्, इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत अण्णांच्या पाठिंब्यासाठी तरूण रस्त्यावर उतरले. यावेळी तरुणांनी भ्रष्टाचाराचा निषेध करत प्रतिकात्मक तिरडी काढली. काल मंगळवारी सकाळी अण्णांच्या अटकेची बातमी कळताच अवघं राळेगणसिध्दी रस्त्यावर उतरलं. गावकर्‍यांनी चौकात येऊन रास्ता रोको केला. गाड्या भरभरून गावकरी स्वत:ला अटक करवून घेत होते. खुंट्या ठोकून भर रस्त्यातच गावकर्‍यांनी म्हशी बांधल्या. म्हशी आणि बैलांवर दडपशाही करणार्‍या नेत्यांची नाव गावकर्‍यांनी संतापाने लिहिली होती. कार्यकर्त्यांनी गाड्या अडवल्या, एसटीला पुढे जाऊ दिले नाही. विद्यार्थी, महिला, वृद्ध सगळेच राळेगणकर रस्त्यावर आले. त्यांनी सरकारचा धिक्कार करत, पोलिसी दमनशाहीवर तीव्र संताप व्यक्त केला. आणि जोपर्यंत अण्णा जेलमध्ये आहेत, तोपर्यंत आम्हीही जेलमध्येच राहणार अशी घोषणा दिल्या. अटक करून घ्यायला अजून गाड्या पाठवून द्या अशीही उपरोधिक विनंती त्यांनी पोलिसांना केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 17, 2011 06:20 AM IST

राळेगणसिद्धीमध्ये साखळी उपोषण ; तरूणांनी काढली प्रभात फेरी

17 ऑगस्ट

अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीमध्ये आज दुसर्‍या दिवशीही राळेगण बंद पुकारण्यात आला असून आजही इथं उस्फूर्त आंदोलन सुरू आहेत. अण्णांच्या समर्थनार्थ यादवबाबा मंदिर परिसरात लाक्षणिक उपोषणा आज दुसर्‍या दिवशीही सुरू आहे. तसेच तरूणांनी प्रभात फेरी काढली. वन्दे मातरम्, इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत अण्णांच्या पाठिंब्यासाठी तरूण रस्त्यावर उतरले. यावेळी तरुणांनी भ्रष्टाचाराचा निषेध करत प्रतिकात्मक तिरडी काढली.

काल मंगळवारी सकाळी अण्णांच्या अटकेची बातमी कळताच अवघं राळेगणसिध्दी रस्त्यावर उतरलं. गावकर्‍यांनी चौकात येऊन रास्ता रोको केला. गाड्या भरभरून गावकरी स्वत:ला अटक करवून घेत होते. खुंट्या ठोकून भर रस्त्यातच गावकर्‍यांनी म्हशी बांधल्या. म्हशी आणि बैलांवर दडपशाही करणार्‍या नेत्यांची नाव गावकर्‍यांनी संतापाने लिहिली होती.

कार्यकर्त्यांनी गाड्या अडवल्या, एसटीला पुढे जाऊ दिले नाही. विद्यार्थी, महिला, वृद्ध सगळेच राळेगणकर रस्त्यावर आले. त्यांनी सरकारचा धिक्कार करत, पोलिसी दमनशाहीवर तीव्र संताप व्यक्त केला. आणि जोपर्यंत अण्णा जेलमध्ये आहेत, तोपर्यंत आम्हीही जेलमध्येच राहणार अशी घोषणा दिल्या. अटक करून घ्यायला अजून गाड्या पाठवून द्या अशीही उपरोधिक विनंती त्यांनी पोलिसांना केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2011 06:20 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close