S M L

'रामलीला'वर तयारी ; आजही मुक्काम तिहारमध्येच

17 ऑगस्टमंगळवारी अण्णांची सुटका करण्यात आली. पण अण्णांनी तिहार तुरुंगाबाहेर येण्यास नकार दिला. आजही अण्णा आपल्या निर्णयावर ठाम राहिले. आपल्या नियोजित उपोषणाला एक महिन्याचा कालावधी देण्यात यावी अशी मागणी अण्णांनी लावून धरली. अण्णांच्या आणि जनतेच्या रेट्यापुढे सरकारने शरणागती पत्कारली. मात्र अण्णांनी आजही तिहार तुरूगाबाहेर येण्यास नकार दिला आहे.आजच्या दिवसातही अण्णा तिहार तुरुंगाबाहेर पडू शकले नाही. दिवसभर झालेल्या वाटाघाटी आशादायक आहेत. पण दिवसअखेर तिढा कायम आहे. सरकारच्या वतीने आज काही वरिष्ठ अधिका-यांनी अण्णांशी चर्चा केली. त्यांनी अण्णांना उपोषणासाठी रामलीला मैदानाचा पर्याय सुचवला. पण ही जागा केवळ सात दिवसांसाठी मिळेल, असं अण्णांना सांगण्यात आलं. अण्णांनी या ऑफरला स्पष्ट शब्दात विरोध केला. कारण अण्णांना बेमुदत उपोषण करण्यासाठी ही जागा 4 आठवड्यांसाठी हवी आहे. काही वेळापूर्वीच मिळालेल्या माहितीनुसार अण्णांना हे मैदान 3 आठवडे देण्याचा विचार दिल्ली पोलिस करत आहे. यावर अजून अण्णांनी उत्तर दिलं नाही. आज रात्री हा तिढा सुटण्याची शक्यता कमी असल्यामुळे अण्णा आजचीही रात्र तिहार तुरुंगात घालवतील अशी दाट शक्यता आहे. अण्णांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून त्यांची तब्येत स्थिर आहे असं आज संध्याकाळी डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, अण्णांच्या विषयावर चर्चा करण्यसाठी काही वेळा पूर्वीच पंतप्रधानांनी एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला प्रणव मुखर्जी, पी चिदंबरम आणि ए के अँटनींसारखे सर्व वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. आज सकाळी अकराच्या सुमारास सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी तिहारमध्ये जाऊन अण्णांची भेट घेतली. ज्या वाटाघाटी दिवसभर सुरू होत्या, त्यातसुद्धा त्या सहभागी झाल्या. तिहार जेलच्या बाहेर अण्णांचे जे समर्थक जमले होते त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर दुपारी योगगुरू बाबा रामदेव आणि श्री श्री रविशंकर अण्णांना भेटायला आले. श्री श्रीनी तिहार जेलमध्ये जाऊन अण्णांची भेटघेतली. पण पोलिसांनी बाबा रामदेव यांना मात्र आत जायला मनाई केली. तर तिहारच्या बाहेर अण्णांच्या पाठिंब्यासाठी प्रचंड जनसागर लोटला होता. मंगळवारी संध्याकाळपासून तिहारच्या बाहेर लोकांची गर्दी जमली होती. अण्णांचे समर्थक त्यांची जेलमधून बाहेर येण्याची वाट पाहत तिहारच्या बाहेरच थांबले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 17, 2011 05:01 PM IST

'रामलीला'वर तयारी ; आजही मुक्काम तिहारमध्येच

17 ऑगस्ट

मंगळवारी अण्णांची सुटका करण्यात आली. पण अण्णांनी तिहार तुरुंगाबाहेर येण्यास नकार दिला. आजही अण्णा आपल्या निर्णयावर ठाम राहिले. आपल्या नियोजित उपोषणाला एक महिन्याचा कालावधी देण्यात यावी अशी मागणी अण्णांनी लावून धरली. अण्णांच्या आणि जनतेच्या रेट्यापुढे सरकारने शरणागती पत्कारली. मात्र अण्णांनी आजही तिहार तुरूगाबाहेर येण्यास नकार दिला आहे.

आजच्या दिवसातही अण्णा तिहार तुरुंगाबाहेर पडू शकले नाही. दिवसभर झालेल्या वाटाघाटी आशादायक आहेत. पण दिवसअखेर तिढा कायम आहे. सरकारच्या वतीने आज काही वरिष्ठ अधिका-यांनी अण्णांशी चर्चा केली. त्यांनी अण्णांना उपोषणासाठी रामलीला मैदानाचा पर्याय सुचवला. पण ही जागा केवळ सात दिवसांसाठी मिळेल, असं अण्णांना सांगण्यात आलं.

अण्णांनी या ऑफरला स्पष्ट शब्दात विरोध केला. कारण अण्णांना बेमुदत उपोषण करण्यासाठी ही जागा 4 आठवड्यांसाठी हवी आहे. काही वेळापूर्वीच मिळालेल्या माहितीनुसार अण्णांना हे मैदान 3 आठवडे देण्याचा विचार दिल्ली पोलिस करत आहे. यावर अजून अण्णांनी उत्तर दिलं नाही.

आज रात्री हा तिढा सुटण्याची शक्यता कमी असल्यामुळे अण्णा आजचीही रात्र तिहार तुरुंगात घालवतील अशी दाट शक्यता आहे. अण्णांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून त्यांची तब्येत स्थिर आहे असं आज संध्याकाळी डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, अण्णांच्या विषयावर चर्चा करण्यसाठी काही वेळा पूर्वीच पंतप्रधानांनी एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला प्रणव मुखर्जी, पी चिदंबरम आणि ए के अँटनींसारखे सर्व वरिष्ठ मंत्री उपस्थित होते.

आज सकाळी अकराच्या सुमारास सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी तिहारमध्ये जाऊन अण्णांची भेट घेतली. ज्या वाटाघाटी दिवसभर सुरू होत्या, त्यातसुद्धा त्या सहभागी झाल्या. तिहार जेलच्या बाहेर अण्णांचे जे समर्थक जमले होते त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला.

त्यानंतर दुपारी योगगुरू बाबा रामदेव आणि श्री श्री रविशंकर अण्णांना भेटायला आले. श्री श्रीनी तिहार जेलमध्ये जाऊन अण्णांची भेटघेतली. पण पोलिसांनी बाबा रामदेव यांना मात्र आत जायला मनाई केली. तर तिहारच्या बाहेर अण्णांच्या पाठिंब्यासाठी प्रचंड जनसागर लोटला होता. मंगळवारी संध्याकाळपासून तिहारच्या बाहेर लोकांची गर्दी जमली होती. अण्णांचे समर्थक त्यांची जेलमधून बाहेर येण्याची वाट पाहत तिहारच्या बाहेरच थांबले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2011 05:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close