S M L

बेस्ट कर्मचार्‍यांचा संप मागे

18 ऑगस्टसहावा वेतन आयोग लागू करण्याच्या आश्वासनानंतर बेस्ट कर्मचार्‍यांनी आज संप मागे घेतला. काल मध्यरात्रीपासून हा संप सुरू झाला होता. बेस्ट वर्कर्स ऍक्शन कमिटीनं या संपाचं आवाहन केलं होतं. त्यामुळे बेेस्टच्या 65 टक्के बसेस बंद होत्या. पण संध्याकाळच्या वेळेस संप मागे घेतल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. मुंबईत कामावर जाणार्‍या चाकरमान्यांना आज चांगल्याच त्रासाला सामोरं जावं लागलं. सहाव्या वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी बेस्टचे कर्मचारी आज संपावर गेले. मध्यरात्रीपासूनच हा संप सुरू झाला. बेस्ट वर्कर्स ऍक्शन कमेटीने या संपाचे आवाहन केले. त्यामुळे बेस्टच्या 65 टक्के बसेस आज रस्त्यावर उतरणार नसल्याचे शरद राव यांनी सांगितले. कायम स्वरूपी आणि हंगामी कर्मचार्‍यांना पगारवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 18, 2011 06:36 PM IST

बेस्ट कर्मचार्‍यांचा संप मागे

18 ऑगस्ट

सहावा वेतन आयोग लागू करण्याच्या आश्वासनानंतर बेस्ट कर्मचार्‍यांनी आज संप मागे घेतला. काल मध्यरात्रीपासून हा संप सुरू झाला होता. बेस्ट वर्कर्स ऍक्शन कमिटीनं या संपाचं आवाहन केलं होतं. त्यामुळे बेेस्टच्या 65 टक्के बसेस बंद होत्या. पण संध्याकाळच्या वेळेस संप मागे घेतल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.

मुंबईत कामावर जाणार्‍या चाकरमान्यांना आज चांगल्याच त्रासाला सामोरं जावं लागलं. सहाव्या वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी बेस्टचे कर्मचारी आज संपावर गेले. मध्यरात्रीपासूनच हा संप सुरू झाला. बेस्ट वर्कर्स ऍक्शन कमेटीने या संपाचे आवाहन केले. त्यामुळे बेस्टच्या 65 टक्के बसेस आज रस्त्यावर उतरणार नसल्याचे शरद राव यांनी सांगितले. कायम स्वरूपी आणि हंगामी कर्मचार्‍यांना पगारवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2011 06:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close