S M L

'रामलीला'वर उपोषण पण विनाअट !

17 ऑगस्ट अण्णा हजारे आणि सरकार दरम्यानचा तिढा आता सुटण्याची शक्यता आहे. अण्णांना पोलिसांनी सात दिवसांची परवनागी दिली आहे. पण अण्णांना एक महिन्याची परवानगी हवी आहे. त्यावर सद्या चर्चा सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी निदर्शने उपोषण संपल्यावर बंद करण्यास सांगितले आहे. पण उपोषण संपल्यावरही निदर्शने आणि धरणे करण्याचीही परवानगी देण्याची मागणी अण्णांनी पोलिसांना केली आहे. अण्णा यासंदर्भात चर्चा करत आहे. जनमताचा रेटा वाढत असल्याने सरकार अण्णांच्या सर्व मागण्या मान्य करण्याची शक्यता आहे. आता उपोषणासाठी रामलीला मैदानाचा पर्याय अण्णांपुढे ठेवण्यात आला. तो पर्याय टीम अण्णांना मान्य होईल अशी चिन्ह आहेत. जेपी पार्कमध्ये लावलेलं 144 वं कलमही हटवण्याचे संकेतही सरकारने दिले आहेत. आज सकाळपासून अण्णा बाहेर येणार म्हणून हजारो समर्थक तिहारबाहेर तळ ठोकून आहेत. सकाळी टीम अण्णांच्या सर्व सदस्यांनी तिहारमध्ये जावून अण्णांशी चर्चा केली. मेधा पाटकर, श्री. श्री. रवीशंकर आणि बाबा रामदेव यांनीही अण्णांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र उपोषणासाठी विनाअट परवानगी मिळावी यावर अण्णा ठाम आहेत. तर बाहेर जमलेल्या समर्थकांना प्रतिक्षा आहे अण्णांच्या बाहेर येण्याची.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 17, 2011 10:58 AM IST

'रामलीला'वर उपोषण पण विनाअट !

17 ऑगस्ट

अण्णा हजारे आणि सरकार दरम्यानचा तिढा आता सुटण्याची शक्यता आहे. अण्णांना पोलिसांनी सात दिवसांची परवनागी दिली आहे. पण अण्णांना एक महिन्याची परवानगी हवी आहे. त्यावर सद्या चर्चा सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी निदर्शने उपोषण संपल्यावर बंद करण्यास सांगितले आहे.

पण उपोषण संपल्यावरही निदर्शने आणि धरणे करण्याचीही परवानगी देण्याची मागणी अण्णांनी पोलिसांना केली आहे. अण्णा यासंदर्भात चर्चा करत आहे. जनमताचा रेटा वाढत असल्याने सरकार अण्णांच्या सर्व मागण्या मान्य करण्याची शक्यता आहे. आता उपोषणासाठी रामलीला मैदानाचा पर्याय अण्णांपुढे ठेवण्यात आला. तो पर्याय टीम अण्णांना मान्य होईल अशी चिन्ह आहेत.

जेपी पार्कमध्ये लावलेलं 144 वं कलमही हटवण्याचे संकेतही सरकारने दिले आहेत. आज सकाळपासून अण्णा बाहेर येणार म्हणून हजारो समर्थक तिहारबाहेर तळ ठोकून आहेत. सकाळी टीम अण्णांच्या सर्व सदस्यांनी तिहारमध्ये जावून अण्णांशी चर्चा केली. मेधा पाटकर, श्री. श्री. रवीशंकर आणि बाबा रामदेव यांनीही अण्णांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र उपोषणासाठी विनाअट परवानगी मिळावी यावर अण्णा ठाम आहेत. तर बाहेर जमलेल्या समर्थकांना प्रतिक्षा आहे अण्णांच्या बाहेर येण्याची.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2011 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close