S M L

आता लढाई व्हाईटवॉश टाळण्यासाठी !

18 ऑगस्टभारत आणि इंग्लंड दरम्यानची चौथी आणि शेवटची टेस्ट मॅच गुरुवारी लंडनमध्ये ओव्हल मैदानावर सुरु होत आहे. सीरिजमध्ये पहिल्या तीन टेस्ट हरल्यानंतर भारतीय टीमकडून नक्की काय अपेक्षा करायच्या हे कुणालाच समजत नाही. नंबर वन पद हातचं गेलंय. आणि व्हाईटवॉशची नामुष्की टीमवर ओढवू नये एवढीच अपेक्षा भारतीय फॅन्स करत आहे. इंग्लंड क्रिकेट टीमसाठी या उन्हाळी हंगामाची सुरुवात तर झकास झाली. भारतीय टीमला नंबर वन पदावरुन त्यांनी हुसकावून लावले. आणि ते ही दिमाखात त्यामुळे या टीमभोवती एक वेगळं वलय तयार झाले. नंबर वन झाल्यानंतर टीमची ही पहिली टेस्ट असणार आहे. या सीरिजमधला त्यांचा सर्वात यशस्वी बॉलर जिमी अँडरसनच्या फिटनेसविषयी शंका आहेत. त्याच्या पायाचा स्नायू दुखावला आहे. पण ग्रॅहम अनियनला बदली खेळाडू म्हणून टीममध्ये घेण्यात आले. आणि ख्रिस ट्रेमलेट अजून पाठीच्या दुखण्यातून सावरला नसला तरी स्टिव्ह फिनमुळे त्याचीही फारशी चिंता नाही. दुसरीकडे भारतासाठी मात्र दुखापतीच्या समस्या नेहमीच्याच झाल्यात. भरीस भर म्हणून प्रवीण कुमारचाही अंगठा मागच्या टेस्टमध्ये दुखावला. आणि त्यामुळे उरलेल्या सीरिजला तो मुकण्याची शक्यता आहे. प्रवीण नसेल तर धोणीला मुनाफ पटेल आणि रुद्रप्रताप सिंग यांच्याबरोबर काम चालवावे लागेल. अमित मिश्राची कामगिरी तिसर्‍या टेस्टमध्ये चांगली नव्हती. त्यामुळे त्याच्याऐवजी प्रग्यान ओझाला खेळवायचे का याचा विचार टीममध्ये सध्या सुरु आहे. शिवाय रैनाऐवजी विराट कोहलीला संधी मिळण्याचीही शक्यता आहे. समस्यांचा असा डोंगर उभा असताना टीमचा आत्मविश्वास डळमळीत नाही झाला तरच नवल...कॅप्टन धोणी मात्र टीमला सावरण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. चौथ्या टेस्टमध्येही इंग्लंडचंच पारडं जड आहे. पण निदान व्हाईटवॉशची नामुष्की भारतीय टीम टाळेल अशी फॅन्सना आशा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 18, 2011 09:59 AM IST

आता लढाई व्हाईटवॉश टाळण्यासाठी !

18 ऑगस्ट

भारत आणि इंग्लंड दरम्यानची चौथी आणि शेवटची टेस्ट मॅच गुरुवारी लंडनमध्ये ओव्हल मैदानावर सुरु होत आहे. सीरिजमध्ये पहिल्या तीन टेस्ट हरल्यानंतर भारतीय टीमकडून नक्की काय अपेक्षा करायच्या हे कुणालाच समजत नाही. नंबर वन पद हातचं गेलंय. आणि व्हाईटवॉशची नामुष्की टीमवर ओढवू नये एवढीच अपेक्षा भारतीय फॅन्स करत आहे.

इंग्लंड क्रिकेट टीमसाठी या उन्हाळी हंगामाची सुरुवात तर झकास झाली. भारतीय टीमला नंबर वन पदावरुन त्यांनी हुसकावून लावले. आणि ते ही दिमाखात त्यामुळे या टीमभोवती एक वेगळं वलय तयार झाले. नंबर वन झाल्यानंतर टीमची ही पहिली टेस्ट असणार आहे. या सीरिजमधला त्यांचा सर्वात यशस्वी बॉलर जिमी अँडरसनच्या फिटनेसविषयी शंका आहेत. त्याच्या पायाचा स्नायू दुखावला आहे.

पण ग्रॅहम अनियनला बदली खेळाडू म्हणून टीममध्ये घेण्यात आले. आणि ख्रिस ट्रेमलेट अजून पाठीच्या दुखण्यातून सावरला नसला तरी स्टिव्ह फिनमुळे त्याचीही फारशी चिंता नाही. दुसरीकडे भारतासाठी मात्र दुखापतीच्या समस्या नेहमीच्याच झाल्यात. भरीस भर म्हणून प्रवीण कुमारचाही अंगठा मागच्या टेस्टमध्ये दुखावला. आणि त्यामुळे उरलेल्या सीरिजला तो मुकण्याची शक्यता आहे. प्रवीण नसेल तर धोणीला मुनाफ पटेल आणि रुद्रप्रताप सिंग यांच्याबरोबर काम चालवावे लागेल. अमित मिश्राची कामगिरी तिसर्‍या टेस्टमध्ये चांगली नव्हती. त्यामुळे त्याच्याऐवजी प्रग्यान ओझाला खेळवायचे का याचा विचार टीममध्ये सध्या सुरु आहे. शिवाय रैनाऐवजी विराट कोहलीला संधी मिळण्याचीही शक्यता आहे.

समस्यांचा असा डोंगर उभा असताना टीमचा आत्मविश्वास डळमळीत नाही झाला तरच नवल...कॅप्टन धोणी मात्र टीमला सावरण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. चौथ्या टेस्टमध्येही इंग्लंडचंच पारडं जड आहे. पण निदान व्हाईटवॉशची नामुष्की भारतीय टीम टाळेल अशी फॅन्सना आशा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2011 09:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close