S M L

..तर 30 ऑगस्टला पुन्हा जेलभरो !

19 ऑगस्टजनलोकपाल विधेयक संसदेत जो पर्यंत आणले जात नाही तोपर्यंत रामलीला मैदान सोडणार नाही. पहिले जनलोकपाल बिल आणावे तरच आम्ही उपोषण सोडू जर सरकारने 30 ऑगस्ट पर्यंत हे विधेयक आणले नाही तर पुन्हा एकदा जेलभरो आंदोलन केले जाईल असा इशारा अण्णांनी सरकारला दिला आहे. तसेच किरण बेदी यांनी 9 विरोधी पक्षांनी सरकारी लोकपाल विधेयक मागे घेण्याची विनंती सरकारला केली आहे. तसेच एक सक्षम लोकपाल विधेयक सादर करण्याचे आवाहन केले. अशी माहिती किरण बेदींनी टिविट्‌रवर दिली.तीन दिवसानंतर अण्णा आज सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी तिहार जेलच्या बाहेर आले. त्यानंतर उघड्या ट्रकमधून ते राजघाटवर गेले. लोकांचा जनसागर अण्णांच्या मागोमाग चालत राजघाटवर गेला. दुपारी दोनच्या सुमाराला अण्णा उपोषणाच्या ठिकाणी म्हणजे रामलीला मैदानात पोचले.आणि मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी घोषणा केली. दिवसभर पावसाने हजेरी लावली मात्र पावसाचा कोणताही परिणाम अण्णांच्या उपोषणावर झाला नाही. संध्याकाळी अण्णा टीमने पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्लाबोल केला.येत्या 11 दिवसात म्हणजे 30 ऑगस्टपर्यंत सरकारने जनलोकपाल विधेयक आणावे अन्यथा पुन्हा जेलभरो आंदोलन केलं जाईल असा इशारा सरकारला दिला. जनलोकपाल विधेयक मंजूर करावे तरच उपोषण मागे घेईल असं अण्णांनी सांगितले. तर अण्णा टीम कोणतीही निवडणूक लढणार नाही असं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. जनलोकपाल विधेयकावर लोकमत घेण्याचं आव्हान कायदेतज्ज्ञ आणि नागरी समितीचे सदस्य प्रशांत भूषण यांनी सरकारला दिलं. स्वामी अग्निवेश यांनीही आज सरकारला जनतेचा आवाज ऐकण्याचं आवाहन केलं. जनतेला जनलोकपाल हवाय, हा आवाज सरकारने ऐकावा, असं आवाहन अग्निवेश यांनी केले.घटनाक्रमसकाळी 10.00 वा.अण्णांना पाहण्याची उत्सुकता तिहार तुरुंगाबाहोर शिगेला पोचली असताना तुरुंगातल्या तुरूंग अधिक्षकांच्या ऑफिसमध्ये अण्णांची तपासणी करायला डॉक्टर आले. तीन दिवसांत अण्णांचे वजन तीन किलोंनी कमी झालं. ही तपासणी तासभर चालली.सकाळी 11:40 वा. अण्णा तिहार तुरंगाबाहेर पडले. आणि बाहेर जमलेल्या समर्थकांमध्ये एकच जल्लोष सुरू झाला. तीन दिवस तिहारमध्ये सत्याग्रह करून त्यांनी उपोषण करण्यासाठी हक्काची जागा मिळवली होती. आणि आता त्यांच्या आंदोलनातला दुसरा टप्पा सुरू होणार होता. प्रचंड जनसमुदायाने अण्णांचं घोषणांच्या निनादात स्वागत केलं. अण्णांनी सगळ्यांना अभिवादन केलं. वंदेमातरम्‌चा नारा अण्णांनी देताच स्फूर्तीची एक लहरच समर्थकांमध्ये पसरली.12:10 वा. तिहारबाहेर अण्णांनी पहिलं पाऊल टाकताच जोरदार पावसानं त्यांचं स्वागत केलं. अण्णा त्यांच्यासाठी खास तयार केलेल्या उघड्या ट्रकमध्ये चढले आणि मायापुरी परिसराकडे रवाना झाले. पावसाची पर्वा न करता लोकांचा महासागर अण्णांच्या मागे चालत होता.दुपारी 1:30 वा.अण्णांचा काफिला राजघाटावर पोचला. ट्रकमधून उतरताच अण्णा गांधीजींच्या समाधीस्थळाकडे अक्षरशः धावतच गेले. गांधीजींना अभिवादन करून काही क्षण त्यांनी चितंन केले.आणि रामलीला मैदानाकडे रवाना झाले.दुपारी 2:00 वा.रामलीला मैदानातही कोसळणार्‍या पावसाच्या सरींनी अण्णांचं स्वागत केलं. इथेही प्रचंड जनसमुदाय त्यांची वाट पाहत होता. अण्णांसोबत त्यांच्या अनेक समर्थकांनीही उपोषणाला सुरुवात केली. क्रांतींचा नवा आदर्श जगाला घालून देण्याचे आवाहन अण्णांनी तरुणांना केले.याच रामलीला मैदानात याच केंद्र सरकारने बाबा रामदेव यांचं आंदोलन चिरडलं होतं. आणि त्या कटू आठवणी ताज्या असतानाच अण्णांनी रामलीला मैदानातून रणशिंग फुंकले.अण्णांच्या तब्बेतीवर 36 डॉक्टारांची नजर36 डॉक्टर्सची एक टीम अण्णांच्या तब्बेतीवर नजर ठेवून आहे. हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर नरेश त्रेहान यांच्या नेतृत्वाखाली ही टीम काम करत आहे. अण्णा जिथे उपोषणाला बसलेत तिथेच या टीमनं एक छोटासा मेडिकल कॅम्पही बनवला आहे. सरकारने अण्णांना 15 दिवसाच्या उपोषणाची परवानगी दिली. त्यामुळे पुढचे 15 दिवस ही टीम इथेच असेल. तिहार तुरुंगातून बाहेर आल्यावर या टीमने अण्णांचे चेकअप केले. अण्णांची तब्येत ठणठणीत असल्याचे डॉक्टर नरेश त्रेहान यांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 19, 2011 02:42 PM IST

..तर 30 ऑगस्टला पुन्हा जेलभरो !

19 ऑगस्ट

जनलोकपाल विधेयक संसदेत जो पर्यंत आणले जात नाही तोपर्यंत रामलीला मैदान सोडणार नाही. पहिले जनलोकपाल बिल आणावे तरच आम्ही उपोषण सोडू जर सरकारने 30 ऑगस्ट पर्यंत हे विधेयक आणले नाही तर पुन्हा एकदा जेलभरो आंदोलन केले जाईल असा इशारा अण्णांनी सरकारला दिला आहे. तसेच किरण बेदी यांनी 9 विरोधी पक्षांनी सरकारी लोकपाल विधेयक मागे घेण्याची विनंती सरकारला केली आहे. तसेच एक सक्षम लोकपाल विधेयक सादर करण्याचे आवाहन केले. अशी माहिती किरण बेदींनी टिविट्‌रवर दिली.

तीन दिवसानंतर अण्णा आज सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी तिहार जेलच्या बाहेर आले. त्यानंतर उघड्या ट्रकमधून ते राजघाटवर गेले. लोकांचा जनसागर अण्णांच्या मागोमाग चालत राजघाटवर गेला. दुपारी दोनच्या सुमाराला अण्णा उपोषणाच्या ठिकाणी म्हणजे रामलीला मैदानात पोचले.आणि मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी घोषणा केली. दिवसभर पावसाने हजेरी लावली मात्र पावसाचा कोणताही परिणाम अण्णांच्या उपोषणावर झाला नाही.

संध्याकाळी अण्णा टीमने पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्लाबोल केला.येत्या 11 दिवसात म्हणजे 30 ऑगस्टपर्यंत सरकारने जनलोकपाल विधेयक आणावे अन्यथा पुन्हा जेलभरो आंदोलन केलं जाईल असा इशारा सरकारला दिला. जनलोकपाल विधेयक मंजूर करावे तरच उपोषण मागे घेईल असं अण्णांनी सांगितले.

तर अण्णा टीम कोणतीही निवडणूक लढणार नाही असं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. जनलोकपाल विधेयकावर लोकमत घेण्याचं आव्हान कायदेतज्ज्ञ आणि नागरी समितीचे सदस्य प्रशांत भूषण यांनी सरकारला दिलं. स्वामी अग्निवेश यांनीही आज सरकारला जनतेचा आवाज ऐकण्याचं आवाहन केलं. जनतेला जनलोकपाल हवाय, हा आवाज सरकारने ऐकावा, असं आवाहन अग्निवेश यांनी केले.

घटनाक्रम

सकाळी 10.00 वा.अण्णांना पाहण्याची उत्सुकता तिहार तुरुंगाबाहोर शिगेला पोचली असताना तुरुंगातल्या तुरूंग अधिक्षकांच्या ऑफिसमध्ये अण्णांची तपासणी करायला डॉक्टर आले. तीन दिवसांत अण्णांचे वजन तीन किलोंनी कमी झालं. ही तपासणी तासभर चालली.

सकाळी 11:40 वा. अण्णा तिहार तुरंगाबाहेर पडले. आणि बाहेर जमलेल्या समर्थकांमध्ये एकच जल्लोष सुरू झाला. तीन दिवस तिहारमध्ये सत्याग्रह करून त्यांनी उपोषण करण्यासाठी हक्काची जागा मिळवली होती. आणि आता त्यांच्या आंदोलनातला दुसरा टप्पा सुरू होणार होता. प्रचंड जनसमुदायाने अण्णांचं घोषणांच्या निनादात स्वागत केलं. अण्णांनी सगळ्यांना अभिवादन केलं. वंदेमातरम्‌चा नारा अण्णांनी देताच स्फूर्तीची एक लहरच समर्थकांमध्ये पसरली.

12:10 वा. तिहारबाहेर अण्णांनी पहिलं पाऊल टाकताच जोरदार पावसानं त्यांचं स्वागत केलं. अण्णा त्यांच्यासाठी खास तयार केलेल्या उघड्या ट्रकमध्ये चढले आणि मायापुरी परिसराकडे रवाना झाले. पावसाची पर्वा न करता लोकांचा महासागर अण्णांच्या मागे चालत होता.

दुपारी 1:30 वा.अण्णांचा काफिला राजघाटावर पोचला. ट्रकमधून उतरताच अण्णा गांधीजींच्या समाधीस्थळाकडे अक्षरशः धावतच गेले. गांधीजींना अभिवादन करून काही क्षण त्यांनी चितंन केले.आणि रामलीला मैदानाकडे रवाना झाले.

दुपारी 2:00 वा.रामलीला मैदानातही कोसळणार्‍या पावसाच्या सरींनी अण्णांचं स्वागत केलं. इथेही प्रचंड जनसमुदाय त्यांची वाट पाहत होता. अण्णांसोबत त्यांच्या अनेक समर्थकांनीही उपोषणाला सुरुवात केली. क्रांतींचा नवा आदर्श जगाला घालून देण्याचे आवाहन अण्णांनी तरुणांना केले.

याच रामलीला मैदानात याच केंद्र सरकारने बाबा रामदेव यांचं आंदोलन चिरडलं होतं. आणि त्या कटू आठवणी ताज्या असतानाच अण्णांनी रामलीला मैदानातून रणशिंग फुंकले.

अण्णांच्या तब्बेतीवर 36 डॉक्टारांची नजर

36 डॉक्टर्सची एक टीम अण्णांच्या तब्बेतीवर नजर ठेवून आहे. हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर नरेश त्रेहान यांच्या नेतृत्वाखाली ही टीम काम करत आहे. अण्णा जिथे उपोषणाला बसलेत तिथेच या टीमनं एक छोटासा मेडिकल कॅम्पही बनवला आहे. सरकारने अण्णांना 15 दिवसाच्या उपोषणाची परवानगी दिली. त्यामुळे पुढचे 15 दिवस ही टीम इथेच असेल. तिहार तुरुंगातून बाहेर आल्यावर या टीमने अण्णांचे चेकअप केले. अण्णांची तब्येत ठणठणीत असल्याचे डॉक्टर नरेश त्रेहान यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 19, 2011 02:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close