S M L

अण्णांबद्दल अपशब्द काढणार्‍या काँग्रेस नेत्यांची घृणा वाटते - विखे पाटील

22 ऑगस्टआधीच सगळीकडून अडचणीत सापडलेल्या काँग्रेसला आता त्यांच्या पक्षातूनही होणार्‍या कठोर टीकेला सामोरं जावं लागतंय. अण्णा हजारे यांचं आंदोलन हाताळताना काँग्रेस चूक करतं आहे. आंदोलनाबाबतची केंद्र सरकारची भूमिका अनाकलनीय आहे. त्याचबरोबर अण्णांबद्दल अपशब्द काढणार्‍या काँग्रेस नेत्यांची घृणा वाटते अशी जळजळीत टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी आमच्या आजचा सवाल या कार्यक्रमात बोलताना केली. एवढंच नाही तर सर्व राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाच्या टोप्या उतरवून अण्णांच्या आंदोलनात सामील व्हावं असं आवाहनही बाळासाहेब विखे पाटील यांनी केलंय. तसेच वेळ न घालवता जनलोकपाल बिल पास करा त्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणीही विखे पाटील यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2013 01:56 PM IST

अण्णांबद्दल अपशब्द काढणार्‍या काँग्रेस नेत्यांची घृणा वाटते - विखे पाटील

22 ऑगस्ट

आधीच सगळीकडून अडचणीत सापडलेल्या काँग्रेसला आता त्यांच्या पक्षातूनही होणार्‍या कठोर टीकेला सामोरं जावं लागतंय. अण्णा हजारे यांचं आंदोलन हाताळताना काँग्रेस चूक करतं आहे. आंदोलनाबाबतची केंद्र सरकारची भूमिका अनाकलनीय आहे. त्याचबरोबर अण्णांबद्दल अपशब्द काढणार्‍या काँग्रेस नेत्यांची घृणा वाटते अशी जळजळीत टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी आमच्या आजचा सवाल या कार्यक्रमात बोलताना केली. एवढंच नाही तर सर्व राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाच्या टोप्या उतरवून अण्णांच्या आंदोलनात सामील व्हावं असं आवाहनही बाळासाहेब विखे पाटील यांनी केलंय. तसेच वेळ न घालवता जनलोकपाल बिल पास करा त्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणीही विखे पाटील यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 22, 2011 06:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close