S M L

..तर खासदारांच्या घराबाहेर आंदोलन करा - अण्णा

23 ऑगस्टअण्णांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस उजाडला आहे. 17 तासांनंतर आज अण्णांनी रामलीला मैदानावर समर्थकांना मार्गदर्शन केले. या आंदोलनासाठी जास्तीत जास्त तरूणांनी रस्त्यावर उतरावे पण अंहिसक मार्गानेच आंदोलन करण्याचे आवाहन अण्णांनी केले. शिवाय 30 ऑगस्टपर्यंत जर जनलोकपाल विधेयकाबाबत काही तोडगा निघाला नाही तर सर्व खासदारांच्या घरांसमोर आंदोलन करण्याचे आवाहन अण्णांनी सर्व समर्थकांना केले. आंदोलनात दारू पिऊन गोंधळ घालू नका, अशा प्रकारांमुळे आंदोलन बदनाम होईल. जीवन फक्त मौजमजेसाठी नाही असं आवाहनही अण्णांनी आंदोलकांना केले. माझं वजन कमी झालं असलं तरी माझी प्रकृती ठिक आहे असं अण्णांनी स्पष्ट केले. जनतेला खरं स्वातंत्र्य अनुभवता यावं म्हणून मी उपोषण करत असल्याचंही ते बोलले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 23, 2011 06:21 PM IST

..तर खासदारांच्या घराबाहेर आंदोलन करा - अण्णा

23 ऑगस्ट

अण्णांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस उजाडला आहे. 17 तासांनंतर आज अण्णांनी रामलीला मैदानावर समर्थकांना मार्गदर्शन केले. या आंदोलनासाठी जास्तीत जास्त तरूणांनी रस्त्यावर उतरावे पण अंहिसक मार्गानेच आंदोलन करण्याचे आवाहन अण्णांनी केले. शिवाय 30 ऑगस्टपर्यंत जर जनलोकपाल विधेयकाबाबत काही तोडगा निघाला नाही तर सर्व खासदारांच्या घरांसमोर आंदोलन करण्याचे आवाहन अण्णांनी सर्व समर्थकांना केले. आंदोलनात दारू पिऊन गोंधळ घालू नका, अशा प्रकारांमुळे आंदोलन बदनाम होईल. जीवन फक्त मौजमजेसाठी नाही असं आवाहनही अण्णांनी आंदोलकांना केले. माझं वजन कमी झालं असलं तरी माझी प्रकृती ठिक आहे असं अण्णांनी स्पष्ट केले. जनतेला खरं स्वातंत्र्य अनुभवता यावं म्हणून मी उपोषण करत असल्याचंही ते बोलले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 23, 2011 06:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close