S M L

कारवाई झालेल्या अधिकार्‍यांच्या विरोधात पालघरमध्ये बंद

23 ऑगस्टठाण्याजवळच्या पालघर येथील मुख्य अधिकारी प्रियंका केसरकर यांना ऍन्टी करप्शन विभागाने पकडल्यानंतर देखील त्या कामावर रूजू झाल्याच्या निषेधार्थ पालघरमध्ये आज सकाळपासून सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला. एका बिल्डरकडून पैशाची मागणी करताना ठाणे अँन्टीकरप्शन विभागाने प्रियांका केसरकर यांना काही दिवसांपूर्वी पैशाची मागणी करताना पकडलं होतं. याप्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाकडून त्यांना जामीन मिळाला होता. मात्र पालघर - वाशीतल्या नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. दरम्यान, पालघरच्या सर्व नगरसेवकांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देऊन त्यांच्या बदलीची मागणी केली होती. असं असतांनाही शनिवारी 20 ऑगस्ट रोजी त्या अचानक कामावर रूजू झाल्याने संतप्त झालेल्या सर्वपक्षीय नगरसेवक आणि नागरिकांनी आज बंद पुकराला. पालघरमधील सर्व व्यवहार आज ठप्प आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 23, 2011 12:27 PM IST

कारवाई झालेल्या अधिकार्‍यांच्या विरोधात पालघरमध्ये बंद

23 ऑगस्ट

ठाण्याजवळच्या पालघर येथील मुख्य अधिकारी प्रियंका केसरकर यांना ऍन्टी करप्शन विभागाने पकडल्यानंतर देखील त्या कामावर रूजू झाल्याच्या निषेधार्थ पालघरमध्ये आज सकाळपासून सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला. एका बिल्डरकडून पैशाची मागणी करताना ठाणे अँन्टीकरप्शन विभागाने प्रियांका केसरकर यांना काही दिवसांपूर्वी पैशाची मागणी करताना पकडलं होतं.

याप्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाकडून त्यांना जामीन मिळाला होता. मात्र पालघर - वाशीतल्या नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. दरम्यान, पालघरच्या सर्व नगरसेवकांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देऊन त्यांच्या बदलीची मागणी केली होती. असं असतांनाही शनिवारी 20 ऑगस्ट रोजी त्या अचानक कामावर रूजू झाल्याने संतप्त झालेल्या सर्वपक्षीय नगरसेवक आणि नागरिकांनी आज बंद पुकराला. पालघरमधील सर्व व्यवहार आज ठप्प आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 23, 2011 12:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close