S M L

आज दुपारी सर्वपक्षीय बैठकीनंतर निर्णय

24 ऑगस्टकाल टीम अण्णांशी चर्चा केल्यानंतर रात्री उशीरा पंतप्रधानांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या राजकीय समितीची आणि कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत टीम अण्णांशी सरकारतर्फे वाटाघाटी करणार्‍या अर्थमंत्री प्रणव मुखजीर्ं यांनी बैठकीतल्या चर्चेची माहिती पंतप्रधानांना दिली. तर आज दुपारी होणार्‍या सर्वपक्षीय बैठकीनंतरच याप्रकरणी निर्णय घेतला जाईल असं या बैठकीत ठरल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. लोकपालसंदर्भातील निर्णय हा सर्व पक्षांना विश्वासात घेऊनचं घेतला जाईल अशीही माहिती मिळतेय.आज सकाळी, अनेक घडामोडींनंतर सरकारी सुधारित लोकपाल बिलाचा ड्राफ्ट प्रणव मुखजीर्ंकडे देण्यात येणार आहे. काँग्रेसचे सलमान खुर्शीद आणि संदीप दीक्षित यांच्यातील बैठक आटोपली आहे. आणि सुधारित मसुदा घेऊन ते मुखजीर्ंची भेट घ्यायला निघाले आहेत. दरम्यान अण्णांनी सुचवलेले बदल करायला वेळ लागणार आहे. ते तातडीनं करता येणार नाहीत. ते 10 ते 15 दिवसांनंतरही करता येतील. पण अण्णांनी तोपर्यंत उपोषण करणं त्यांच्या प्रकृतीला धोकादायक आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर उपोषण संपवावे अस खुर्शीद यांनी सूचित केले.चर्चेच्या पहिल्या फेरीनंतर सरकार आणि टीम अण्णांमधील 3 मतभेदाचे मुद्दे - 1) कनिष्ठ सरकारी कर्मचारी हे लोकपालच्या कक्षेत यावेत असा आग्रह नागरी समितीने धरला आहे. जनलोकपालमध्ये याची तरतूद करण्यात आली. लोकपालमध्येही त्याची तरतूद असावी यासाठी नागरी समिती आग्रही आहे.2) केंद्रात ज्याप्रमाणे लोकपाल असावा, तसा प्रत्येक राज्यात लोकायुक्ताची नेमणूक व्हावी यासाठी टीम अण्णा आग्रही आहे.3) सिटीझन चार्टरच्या ( नागरिकांची सनद ) मुद्द्यावरुनही सरकार आणि टीम अण्णांमध्ये मतभेद कायम आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 24, 2011 08:03 AM IST

24 ऑगस्ट

काल टीम अण्णांशी चर्चा केल्यानंतर रात्री उशीरा पंतप्रधानांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या राजकीय समितीची आणि कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत टीम अण्णांशी सरकारतर्फे वाटाघाटी करणार्‍या अर्थमंत्री प्रणव मुखजीर्ं यांनी बैठकीतल्या चर्चेची माहिती पंतप्रधानांना दिली. तर आज दुपारी होणार्‍या सर्वपक्षीय बैठकीनंतरच याप्रकरणी निर्णय घेतला जाईल असं या बैठकीत ठरल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. लोकपालसंदर्भातील निर्णय हा सर्व पक्षांना विश्वासात घेऊनचं घेतला जाईल अशीही माहिती मिळतेय.

आज सकाळी, अनेक घडामोडींनंतर सरकारी सुधारित लोकपाल बिलाचा ड्राफ्ट प्रणव मुखजीर्ंकडे देण्यात येणार आहे. काँग्रेसचे सलमान खुर्शीद आणि संदीप दीक्षित यांच्यातील बैठक आटोपली आहे. आणि सुधारित मसुदा घेऊन ते मुखजीर्ंची भेट घ्यायला निघाले आहेत. दरम्यान अण्णांनी सुचवलेले बदल करायला वेळ लागणार आहे. ते तातडीनं करता येणार नाहीत. ते 10 ते 15 दिवसांनंतरही करता येतील. पण अण्णांनी तोपर्यंत उपोषण करणं त्यांच्या प्रकृतीला धोकादायक आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर उपोषण संपवावे अस खुर्शीद यांनी सूचित केले.

चर्चेच्या पहिल्या फेरीनंतर सरकार आणि टीम अण्णांमधील 3 मतभेदाचे मुद्दे -

1) कनिष्ठ सरकारी कर्मचारी हे लोकपालच्या कक्षेत यावेत असा आग्रह नागरी समितीने धरला आहे. जनलोकपालमध्ये याची तरतूद करण्यात आली. लोकपालमध्येही त्याची तरतूद असावी यासाठी नागरी समिती आग्रही आहे.2) केंद्रात ज्याप्रमाणे लोकपाल असावा, तसा प्रत्येक राज्यात लोकायुक्ताची नेमणूक व्हावी यासाठी टीम अण्णा आग्रही आहे.3) सिटीझन चार्टरच्या ( नागरिकांची सनद ) मुद्द्यावरुनही सरकार आणि टीम अण्णांमध्ये मतभेद कायम आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2011 08:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close