S M L

'लोकपाल'चा नवा मसुदा सरकारने केला तयार

24 ऑगस्टअण्णांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. दिल्लीत वेगवान घडामोडी घडत आहे. आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आलंय. कोंडी फोडण्यासाठी सरकारने एक पाऊल उचलत लोकपालचा सुधारीत मसुदा तयार केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि टीम अण्णा यांच्यात आज चर्चा झाल्यानंतर नवा मसुदा पंतप्रधानांकडे पाठवण्यात आला आहे. त्यानंतर थोड्याच वेळात होणार्‍या सर्वपक्षीय बैठकीत हा मसुदा ठेवण्यात येईल. प्रणव मुखर्जी सर्वपक्षीय बैठकीत चर्चेची माहिती देतील. तसेच अण्णांच्या टीमला लेखी आश्वासन देणं शक्य नाही असं सरकारने स्पष्ट केलं. संसद सर्वोच्च आहे असं प्रणवा मुखर्जी यांनी ठणकावून सांगितले. अंतिम प्रस्ताव दुपारच्या 3.30 वाजताच्या बैठकीत सादर केला जाईल.सरकारची भूमिका झाली सौम्य- पंतप्रधानांना लोकपालच्या कक्षेत आणण्याची सरकारची तयारी- भ्रष्टाचाराची प्रकरणं हाताळताना लोकपालला सीबीआय सारखे अधिकार देण्यास तयार - अधिवेशनाची मुदत वाढवण्याचा किंवा विशेष अधिवेशन बोलावण्यास सरकार तयार

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 24, 2011 09:32 AM IST

'लोकपाल'चा नवा मसुदा सरकारने केला तयार

24 ऑगस्ट

अण्णांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. दिल्लीत वेगवान घडामोडी घडत आहे. आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आलंय. कोंडी फोडण्यासाठी सरकारने एक पाऊल उचलत लोकपालचा सुधारीत मसुदा तयार केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि टीम अण्णा यांच्यात आज चर्चा झाल्यानंतर नवा मसुदा पंतप्रधानांकडे पाठवण्यात आला आहे. त्यानंतर थोड्याच वेळात होणार्‍या सर्वपक्षीय बैठकीत हा मसुदा ठेवण्यात येईल. प्रणव मुखर्जी सर्वपक्षीय बैठकीत चर्चेची माहिती देतील. तसेच अण्णांच्या टीमला लेखी आश्वासन देणं शक्य नाही असं सरकारने स्पष्ट केलं. संसद सर्वोच्च आहे असं प्रणवा मुखर्जी यांनी ठणकावून सांगितले. अंतिम प्रस्ताव दुपारच्या 3.30 वाजताच्या बैठकीत सादर केला जाईल.

सरकारची भूमिका झाली सौम्य

- पंतप्रधानांना लोकपालच्या कक्षेत आणण्याची सरकारची तयारी- भ्रष्टाचाराची प्रकरणं हाताळताना लोकपालला सीबीआय सारखे अधिकार देण्यास तयार - अधिवेशनाची मुदत वाढवण्याचा किंवा विशेष अधिवेशन बोलावण्यास सरकार तयार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2011 09:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close