S M L

अण्णांना काही झाल्यास सरकार जबाबदार असेल - केजरीवाल

24 ऑगस्टअण्णांना काही झालं तर सरकार जबाबदार असेल असा इशाराही केजरीवाल यांनी दिला. त्याचसोबत अण्णांच्या परवानगीशिवाय त्यांना नेलं जाणार नाही असं आश्वासनही पोलिसांनी दिल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. तसेच केंद्रसरकारने जनलोकपाल कायदा तयार करावा अशी मागणी ही यावेळी केली. सर्वपक्षीय बैठकीनंतर अरविंद केजरीवाल यांनी रामलीलावर समर्थकांशी संवाद साधला. यावेळी केजरीवाल म्हणाले की, 2 कोटी लोकांनी इंडिया अगेन्सट करप्शनच्या मिस कॉल मोहिमेला भरभरुन प्रतिसाद दिला आहे. 2 कोटी लोकांनी मिस कॉल करून आपला पाठिंबा दर्शवला आहे. अण्णांचे जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येईल अशा अनेक अफावांना पाय फूटले आहे. त्या अफवांवर विश्वास ठेवू नये अशी माहिती केजरीवाल यांनी यावेळी व्यक्त केली. सर्व पोलीस अधिकार्‍यांच्या आम्ही संपर्कात आहोत. सरकार जो पर्यंत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. उपोषणाबाबत अण्णांचा निर्णय अंतिम राहील असं ही स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 24, 2011 03:38 PM IST

अण्णांना काही झाल्यास सरकार जबाबदार असेल - केजरीवाल

24 ऑगस्ट

अण्णांना काही झालं तर सरकार जबाबदार असेल असा इशाराही केजरीवाल यांनी दिला. त्याचसोबत अण्णांच्या परवानगीशिवाय त्यांना नेलं जाणार नाही असं आश्वासनही पोलिसांनी दिल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. तसेच केंद्रसरकारने जनलोकपाल कायदा तयार करावा अशी मागणी ही यावेळी केली.

सर्वपक्षीय बैठकीनंतर अरविंद केजरीवाल यांनी रामलीलावर समर्थकांशी संवाद साधला. यावेळी केजरीवाल म्हणाले की, 2 कोटी लोकांनी इंडिया अगेन्सट करप्शनच्या मिस कॉल मोहिमेला भरभरुन प्रतिसाद दिला आहे. 2 कोटी लोकांनी मिस कॉल करून आपला पाठिंबा दर्शवला आहे. अण्णांचे जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येईल अशा अनेक अफावांना पाय फूटले आहे. त्या अफवांवर विश्वास ठेवू नये अशी माहिती केजरीवाल यांनी यावेळी व्यक्त केली. सर्व पोलीस अधिकार्‍यांच्या आम्ही संपर्कात आहोत. सरकार जो पर्यंत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. उपोषणाबाबत अण्णांचा निर्णय अंतिम राहील असं ही स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2011 03:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close