S M L

लोकपालावर चर्चेसाठी भाजपने दिली संसदेत नोटीस

26 ऑगस्टअण्णांच्या तीन प्रमुख मागण्यांवर संसदेत आजच चर्चा व्हावी अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपने त्यासाठी दोन्ही सभागृहात नोटीसही दिली. मतदानासह लोकपालवर चर्चा करण्याची भाजपची मागणी आहे. लोकपालच्या मुद्यावर विरोधी पक्षांचे एकमत होता सरकारने चर्चेला सुरूवात केली. यामुळे विरोधकांनी एकच गोंधळ घातला यामुळे दुपारपर्यंत संसदेच कामकाज स्थगित करण्यात आले. भाजपसह इतर विरोधी पक्षांना विश्वासात न घेता जनलोकपाल विधेयकावर नियम 193 च्यानुसार चर्चा करण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या या निर्णयावर नियम 184 च्यानुसार चर्चा करण्याची नोटीस दिली. यावर विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज म्हणाल्या की, त्यांनी लोकसभेत नियम 184 आणि वरिष्ठ नेता अरूण जेटलींनी नियम 176 च्यानुसार राज्यसभेत चर्चेसाठी नोटीस दिली आहे. भाजप या मुद्यावर नियम 193 नुसार चर्चा करण्यास तयार नाही. तसेच लोकसभा अध्यक्षांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत त्यांनी अध्यक्षांना सांगितले की, त्यांच्या नोटिशीला स्वीकार करून चर्चा घडवून आणावी. किंवा प्रधानमंत्री अथवा प्रणव मुखर्जी यांनी यावर खुलासा करून चर्चा करावी. दरम्यान, आज अण्णांच्या उपोषणाचा अकरावा दिवस आहे. अण्णांच्या जनलोकपालसह लोकपालच्या सर्व मसुद्यावर आज संसदेत चर्चा करणार असं काल सरकारतर्फे सांगण्यात आलं होतं. पण जनलोकपालासह लोकपालाच्या आणखी 3 मसुद्यांवर उद्या चर्चा होणार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री पवन बन्सल यांनी म्हटले आहे. त्यामुळे अण्णांचे उपोषण आणखी लांबणार असं दिसतंय. सरकारच्या या कृतीचा भाजपने तीव्र शब्दात निषेध केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 26, 2011 01:01 PM IST

लोकपालावर चर्चेसाठी भाजपने दिली संसदेत नोटीस

26 ऑगस्ट

अण्णांच्या तीन प्रमुख मागण्यांवर संसदेत आजच चर्चा व्हावी अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपने त्यासाठी दोन्ही सभागृहात नोटीसही दिली. मतदानासह लोकपालवर चर्चा करण्याची भाजपची मागणी आहे. लोकपालच्या मुद्यावर विरोधी पक्षांचे एकमत होता सरकारने चर्चेला सुरूवात केली. यामुळे विरोधकांनी एकच गोंधळ घातला यामुळे दुपारपर्यंत संसदेच कामकाज स्थगित करण्यात आले.

भाजपसह इतर विरोधी पक्षांना विश्वासात न घेता जनलोकपाल विधेयकावर नियम 193 च्यानुसार चर्चा करण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या या निर्णयावर नियम 184 च्यानुसार चर्चा करण्याची नोटीस दिली. यावर विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज म्हणाल्या की, त्यांनी लोकसभेत नियम 184 आणि वरिष्ठ नेता अरूण जेटलींनी नियम 176 च्यानुसार राज्यसभेत चर्चेसाठी नोटीस दिली आहे.

भाजप या मुद्यावर नियम 193 नुसार चर्चा करण्यास तयार नाही. तसेच लोकसभा अध्यक्षांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत त्यांनी अध्यक्षांना सांगितले की, त्यांच्या नोटिशीला स्वीकार करून चर्चा घडवून आणावी. किंवा प्रधानमंत्री अथवा प्रणव मुखर्जी यांनी यावर खुलासा करून चर्चा करावी.

दरम्यान, आज अण्णांच्या उपोषणाचा अकरावा दिवस आहे. अण्णांच्या जनलोकपालसह लोकपालच्या सर्व मसुद्यावर आज संसदेत चर्चा करणार असं काल सरकारतर्फे सांगण्यात आलं होतं. पण जनलोकपालासह लोकपालाच्या आणखी 3 मसुद्यांवर उद्या चर्चा होणार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री पवन बन्सल यांनी म्हटले आहे. त्यामुळे अण्णांचे उपोषण आणखी लांबणार असं दिसतंय. सरकारच्या या कृतीचा भाजपने तीव्र शब्दात निषेध केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 26, 2011 01:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close