S M L

उपचारासाठी अण्णा हजारे हॉस्पिटलमध्ये दाखल

28 ऑगस्टजेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे 12 दिवस चाललेले उपोषण अखेर सुटले. अण्णा आता गुढगाव येथील मेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे. उपोषण सोडल्यानंतर अण्णा थेट मेदांत हॉस्पिटलकडे रवाना झाले होते. रामलीला मैदानावरून अण्णा निघताच हजारो तरूण अण्णांच्या ताफ्यात सहभागी झाले. गुढगाव येथे अण्णा येणार म्हणून त्यांना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. मेदांत हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि रूग्णाचे नातेवाईक अण्णांच्या स्वागतासाठी पुष्प गुच्छ घेऊन हजर होते. अण्णांची गाडी हॉस्पिटलच्या आवारात पोहचताच लोकांनी एकच जल्लोष केला. लोक आपल्या भावनांना आवर घालू शकत नव्हते. गेल्या 12 दिवसांपासून अण्णांनी उपोषण केल्यामुळे अण्णांमध्ये अशक्तपणा आला आहे. थकावट आल्यामुळे अण्णा राजघाटवर जाऊ शकले नाही. अण्णा आता 2 ते 3 दिवस मेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2011 07:35 AM IST

उपचारासाठी अण्णा हजारे हॉस्पिटलमध्ये दाखल

28 ऑगस्ट

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे 12 दिवस चाललेले उपोषण अखेर सुटले. अण्णा आता गुढगाव येथील मेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे. उपोषण सोडल्यानंतर अण्णा थेट मेदांत हॉस्पिटलकडे रवाना झाले होते. रामलीला मैदानावरून अण्णा निघताच हजारो तरूण अण्णांच्या ताफ्यात सहभागी झाले. गुढगाव येथे अण्णा येणार म्हणून त्यांना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. मेदांत हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि रूग्णाचे नातेवाईक अण्णांच्या स्वागतासाठी पुष्प गुच्छ घेऊन हजर होते. अण्णांची गाडी हॉस्पिटलच्या आवारात पोहचताच लोकांनी एकच जल्लोष केला. लोक आपल्या भावनांना आवर घालू शकत नव्हते. गेल्या 12 दिवसांपासून अण्णांनी उपोषण केल्यामुळे अण्णांमध्ये अशक्तपणा आला आहे. थकावट आल्यामुळे अण्णा राजघाटवर जाऊ शकले नाही. अण्णा आता 2 ते 3 दिवस मेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2011 07:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close