S M L

पश्चिम महाराष्ट्रातील धरणं तुडूंब

29 ऑगस्टपश्चिम महाराष्ट्रातील धरणांमध्ये मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण 100 टक्के भरलं आहे. धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले. धरणातून 8 हजार आठशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतोय. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. राजाराम बंधार्‍याची पाण्याची पातळी 30 फुटावर जाऊन पोहोचली आहेत. जिल्ह्यातील भोगवती, कुंभी, तुळशी नद्यांचे पाणीही पात्राबाहेर पडले आहे. तर - सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरु आहे. कोयना धरणाचे सर्व दरवाजे 11 फूटाने उघडले असून धरणातून 95 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरण क्षेत्रातील संततधार सुरु असल्याने विसर्ग वाढू शकतो. कराड, पाटन आणि सांगली शहराला पुराचा धोका असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहेत. तर पुण्यातीलं खडकवासला धरण सुध्दा पूर्ण भरले आहे. या धरणातून सध्या 40 हजार क्यूसेक्स पाणी सोडण्यात येतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 29, 2011 11:58 AM IST

पश्चिम महाराष्ट्रातील धरणं तुडूंब

29 ऑगस्ट

पश्चिम महाराष्ट्रातील धरणांमध्ये मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण 100 टक्के भरलं आहे. धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले. धरणातून 8 हजार आठशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतोय. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.

राजाराम बंधार्‍याची पाण्याची पातळी 30 फुटावर जाऊन पोहोचली आहेत. जिल्ह्यातील भोगवती, कुंभी, तुळशी नद्यांचे पाणीही पात्राबाहेर पडले आहे. तर - सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरु आहे. कोयना धरणाचे सर्व दरवाजे 11 फूटाने उघडले असून धरणातून 95 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

धरण क्षेत्रातील संततधार सुरु असल्याने विसर्ग वाढू शकतो. कराड, पाटन आणि सांगली शहराला पुराचा धोका असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहेत. तर पुण्यातीलं खडकवासला धरण सुध्दा पूर्ण भरले आहे. या धरणातून सध्या 40 हजार क्यूसेक्स पाणी सोडण्यात येतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 29, 2011 11:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close