S M L

किरण बेदी, ओमपुरींना हक्कभंगाची नोटीस

29 ऑगस्टसंसद सदस्यांचा अपमान केल्याच्या आरोपावरुन किरण बेदी आणि अभिनेते ओमपुरी यांच्यावर हक्कभंग होण्याची शक्यता आहे. तसा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांनी हक्कभंग समितीकडे पाठवला आहे. अण्णा हजारे यांच्या उपोषणादरम्यान किरण बेदी यांनी काही मंत्र्यांची नक्कल केली होती तर ओम पुरी यांनी व्यासपीठावरुनच संसद सदस्यांना अशिक्षित म्हटलं होतं. राज्यसभा आणि लोकसभेच्या सहा सदस्यांनी याप्रकरणी या दोघांविरोधात हक्कभंग दाखल केला आहे.26 ऑगस्टला रामलीला मैदानावर अभिनेता ओमपुरी यांनी हजेरी लावली होती. व्यासपीठावरून बोलत असतांना आपण निवडणून दिलेले खासदार काय करत आहे. अण्णांचे उपोषणाचा आज दहावा दिवस असून ही लोक काहीच करत नाही. ही लोक अनपढ,गवार आहे अशा शब्दात ओमपुरींने थेट खासदारांवर हल्ला चढवला होता. तर किरण बेदी यांच्याबाबतीत तर वेगळेच घडले. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे अण्णांची भेट घेण्यासाठी आले असता. किरण बेदी यांनी उध्दटपणे वागल्याचे समजत आहे. यानंतर किरण बेदी यांनी व्यासपीठावर नेत्यांची नक्कल केली होती. रामलीला मैदानावर नेत्यांच्या नक्कला करण्यात किरण बेदींना मात्र जे घडलं त्यात चुकीचं काहीच वाटत नाही. उलट आपल्या याच कृतीमुळे राजकीय नेतेही कामाला लागले असेच किरण बेदींना वाटतंय. पण आपल्या नेत्यांना मात्र किरण बेदींचं हे वक्तव्य अर्थातच पटलेलं नाही.हक्कभंग प्रस्तावाद्वारे खासदार एखाद्याने त्याच्या प्रतिष्ठेला धक्का लावल्याबद्दल तक्रार करू शकतो.जर हक्कभंग समितीने हा प्रस्ताव स्विकारला तर त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते आणि त्याला माफी मागायला सांगितले जाऊ शकते किंवा त्याला 15 ते 30 दिवसांची कोठडीही होऊ शकते..2 जी प्रकरणाबाबत पंतप्रधानांनी संयुक्त संसदीय समितीसाठी नकार दिला त्यावेळेस भाजपने पंतप्रधानांविरोधात हक्कभंग आणला होता. हक्कभंग प्रस्ताव हे खरंतर एकमेकांविरोधात राजकीय हत्यार समजलं जातं. आता राजकीय पक्षच त्यांच्या विशेषाधिकारासाठी वापरत आहे.किरण बेदी आणि ओम पुरींविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आल्यावर पुढे नेमकं काय होणार - किरण बेदी आणि ओम पुरी यांना नोटीस पाठवून त्यांचे स्पष्टीकरण मागवण्यात येईल- संसदेचा हक्कभंग करणा-यांवर कारवाई करण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो- जर हक्कभंगाचे प्रकरण किरकोळ असेल, तर सभागृह ते रद्द करू शकते- जर हक्कभंग करणार्‍या व्यक्तीने माफी मागितली, तर ते प्रकरण हक्कभंग समितीकडे न पाठवण्याचा निर्णय सभागृह घेऊ शकते- हक्कभंग गंभीर स्वरूपाचा असेल, तर शिक्षा म्हणून त्या व्यक्तीची खरडपट्टी काढली जाते

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 29, 2011 10:42 AM IST

किरण बेदी, ओमपुरींना हक्कभंगाची नोटीस

29 ऑगस्ट

संसद सदस्यांचा अपमान केल्याच्या आरोपावरुन किरण बेदी आणि अभिनेते ओमपुरी यांच्यावर हक्कभंग होण्याची शक्यता आहे. तसा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांनी हक्कभंग समितीकडे पाठवला आहे. अण्णा हजारे यांच्या उपोषणादरम्यान किरण बेदी यांनी काही मंत्र्यांची नक्कल केली होती तर ओम पुरी यांनी व्यासपीठावरुनच संसद सदस्यांना अशिक्षित म्हटलं होतं. राज्यसभा आणि लोकसभेच्या सहा सदस्यांनी याप्रकरणी या दोघांविरोधात हक्कभंग दाखल केला आहे.

26 ऑगस्टला रामलीला मैदानावर अभिनेता ओमपुरी यांनी हजेरी लावली होती. व्यासपीठावरून बोलत असतांना आपण निवडणून दिलेले खासदार काय करत आहे. अण्णांचे उपोषणाचा आज दहावा दिवस असून ही लोक काहीच करत नाही. ही लोक अनपढ,गवार आहे अशा शब्दात ओमपुरींने थेट खासदारांवर हल्ला चढवला होता. तर किरण बेदी यांच्याबाबतीत तर वेगळेच घडले. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे अण्णांची भेट घेण्यासाठी आले असता. किरण बेदी यांनी उध्दटपणे वागल्याचे समजत आहे. यानंतर किरण बेदी यांनी व्यासपीठावर नेत्यांची नक्कल केली होती.

रामलीला मैदानावर नेत्यांच्या नक्कला करण्यात किरण बेदींना मात्र जे घडलं त्यात चुकीचं काहीच वाटत नाही. उलट आपल्या याच कृतीमुळे राजकीय नेतेही कामाला लागले असेच किरण बेदींना वाटतंय. पण आपल्या नेत्यांना मात्र किरण बेदींचं हे वक्तव्य अर्थातच पटलेलं नाही.हक्कभंग प्रस्तावाद्वारे खासदार एखाद्याने त्याच्या प्रतिष्ठेला धक्का लावल्याबद्दल तक्रार करू शकतो.

जर हक्कभंग समितीने हा प्रस्ताव स्विकारला तर त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते आणि त्याला माफी मागायला सांगितले जाऊ शकते किंवा त्याला 15 ते 30 दिवसांची कोठडीही होऊ शकते..

2 जी प्रकरणाबाबत पंतप्रधानांनी संयुक्त संसदीय समितीसाठी नकार दिला त्यावेळेस भाजपने पंतप्रधानांविरोधात हक्कभंग आणला होता. हक्कभंग प्रस्ताव हे खरंतर एकमेकांविरोधात राजकीय हत्यार समजलं जातं. आता राजकीय पक्षच त्यांच्या विशेषाधिकारासाठी वापरत आहे.

किरण बेदी आणि ओम पुरींविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आल्यावर पुढे नेमकं काय होणार - किरण बेदी आणि ओम पुरी यांना नोटीस पाठवून त्यांचे स्पष्टीकरण मागवण्यात येईल- संसदेचा हक्कभंग करणा-यांवर कारवाई करण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो- जर हक्कभंगाचे प्रकरण किरकोळ असेल, तर सभागृह ते रद्द करू शकते- जर हक्कभंग करणार्‍या व्यक्तीने माफी मागितली, तर ते प्रकरण हक्कभंग समितीकडे न पाठवण्याचा निर्णय सभागृह घेऊ शकते- हक्कभंग गंभीर स्वरूपाचा असेल, तर शिक्षा म्हणून त्या व्यक्तीची खरडपट्टी काढली जाते

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 29, 2011 10:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close