S M L

ठाणे-पनवेल बॉम्बस्फोटप्रकरणी दोघांना 10 वर्षांची सक्तमजुरी

30 ऑगस्टठाणे आणि पनवेलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणात सनातन संस्थेच्या दोन साधकांना दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दोघांना काल मुंबई सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. तसंच त्यांच्यासोबतच्या इतर चौघांना पुराव्याअभावी निर्दोष सोडलं होतं. रमेश गडकरी आणि विक्रम भावे या दोषींना कोर्टानं आज शिक्षा सुनावली. पनवेलमध्ये 20 फेब्रुवारी 2008 ला बॉम्बस्फोट झाला. त्यानंतर वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात 31 मे 2008 रोजी बॉम्ब सापडला होता. तर ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये 4 जून 2008 मध्ये नाट्यगृहाच्या पार्किंगमध्ये स्फोट झाला होता. त्यात 8 जखमी झाले होते. रमेश गडकरी आणि विक्रम भावे यांना ठाणे आणि वाशी इथल्या स्फोटाशी संबंधित घटनेबाबत कोर्टानं दोषी ठरवलंय आणि शिक्षाही सुनावलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 30, 2011 05:04 PM IST

ठाणे-पनवेल बॉम्बस्फोटप्रकरणी दोघांना 10 वर्षांची सक्तमजुरी

30 ऑगस्ट

ठाणे आणि पनवेलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणात सनातन संस्थेच्या दोन साधकांना दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दोघांना काल मुंबई सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. तसंच त्यांच्यासोबतच्या इतर चौघांना पुराव्याअभावी निर्दोष सोडलं होतं. रमेश गडकरी आणि विक्रम भावे या दोषींना कोर्टानं आज शिक्षा सुनावली. पनवेलमध्ये 20 फेब्रुवारी 2008 ला बॉम्बस्फोट झाला. त्यानंतर वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात 31 मे 2008 रोजी बॉम्ब सापडला होता. तर ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये 4 जून 2008 मध्ये नाट्यगृहाच्या पार्किंगमध्ये स्फोट झाला होता. त्यात 8 जखमी झाले होते. रमेश गडकरी आणि विक्रम भावे यांना ठाणे आणि वाशी इथल्या स्फोटाशी संबंधित घटनेबाबत कोर्टानं दोषी ठरवलंय आणि शिक्षाही सुनावलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 30, 2011 05:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close