S M L

टू जी घोटाळाप्रकरणी जसवंत सिंगांची चौकशी होण्याची शक्यता

01 सप्टेंबर2 जी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आज सुप्रीम कोर्टात स्टेटस रिपोर्ट सादर केला. त्यात एनडीएच्या अरुण शौरी दूरसंचार मंत्री असतानाझालेल्या 2 जी लायसन्सच्या वाटपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहेत. या प्रकरणात तेव्हाचे अर्थमंत्री जसवंत सिंग यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे माजी दूरसंचार मंत्री दयानिधी मारन यांना मात्र सीबीआयने दिलासा दिला. एअरसेल-मार्क्सिस डीलमध्ये मारन यांनी दबाव टाकल्याचा कोणताच पुरावा उपलब्ध नसल्याचे सीबीआयने म्हटले आहे. पण, एअरसेलला लायसन्स देण्यात दिरंगाई झाली. या आरोपाची चौकशी सुरू असल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलंय. सीबीआय पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. मारन यांच्याविरोधात सीबीआयला पुरावे मिळाले नाहीत हे दुदैर्वी असल्याचे भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि पंतप्रधान कार्यालयाच्या सहभाची चौकशी का होत नाही असा प्रश्न त्यांनी विचारला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 1, 2011 02:02 PM IST

टू जी घोटाळाप्रकरणी जसवंत सिंगांची चौकशी होण्याची शक्यता

01 सप्टेंबर

2 जी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आज सुप्रीम कोर्टात स्टेटस रिपोर्ट सादर केला. त्यात एनडीएच्या अरुण शौरी दूरसंचार मंत्री असतानाझालेल्या 2 जी लायसन्सच्या वाटपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहेत. या प्रकरणात तेव्हाचे अर्थमंत्री जसवंत सिंग यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे माजी दूरसंचार मंत्री दयानिधी मारन यांना मात्र सीबीआयने दिलासा दिला. एअरसेल-मार्क्सिस डीलमध्ये मारन यांनी दबाव टाकल्याचा कोणताच पुरावा उपलब्ध नसल्याचे सीबीआयने म्हटले आहे. पण, एअरसेलला लायसन्स देण्यात दिरंगाई झाली. या आरोपाची चौकशी सुरू असल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलंय.

सीबीआय पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. मारन यांच्याविरोधात सीबीआयला पुरावे मिळाले नाहीत हे दुदैर्वी असल्याचे भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि पंतप्रधान कार्यालयाच्या सहभाची चौकशी का होत नाही असा प्रश्न त्यांनी विचारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 1, 2011 02:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close