S M L

'पुढच्या वर्षी लवकर या'

02 सप्टेंबर"गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या" च्या गजरात आज दीड दिवसाच्या गणपतींचं आज विसर्जन झालं. मुंबईत दादर आणि जुहू चौपाटीवर विसर्जनासाठी गर्दी झाली होती. तर पुण्यातही दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन करण्यात आलं. गणपती बाप्पा मोरया ..पुढच्या वर्षीचा जयघोष इथंही सुरू होता. पुण्यामध्ये सतत सुरु असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून जास्त पाणी सोडलं जातं आहे. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे फायरब्रिगेडच्या लाईफगार्ड्सच्या मदतीनं गणेश विसर्जन करावे लागत होते. अनेक विसर्जन हौदसुद्धा पाण्याखाली गेले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 2, 2011 04:34 PM IST

02 सप्टेंबर

"गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या" च्या गजरात आज दीड दिवसाच्या गणपतींचं आज विसर्जन झालं. मुंबईत दादर आणि जुहू चौपाटीवर विसर्जनासाठी गर्दी झाली होती. तर पुण्यातही दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन करण्यात आलं. गणपती बाप्पा मोरया ..पुढच्या वर्षीचा जयघोष इथंही सुरू होता. पुण्यामध्ये सतत सुरु असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून जास्त पाणी सोडलं जातं आहे. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे फायरब्रिगेडच्या लाईफगार्ड्सच्या मदतीनं गणेश विसर्जन करावे लागत होते. अनेक विसर्जन हौदसुद्धा पाण्याखाली गेले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 2, 2011 04:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close