S M L

पुन्हा कोकण रेल्वे ब्लॉक

02 सप्टेंबरकोकण रेल्वेचं विघ्न सरता सरेना...कोकण रेल्वे ट्रक आज ही मातीच्या ढिगा खाली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीतच आहे. अजूनही पोमेंडी ट्रॅकवर माती हटवण्याचं काम सुरू आहे. गाड्या उशिराने धावत आहे. एक ते दोन तासाने एक ट्रेन सोडण्यात येतेय आणि मग पुन्हा हे काम सुरू करण्यात येतंय. यापैकी काही गाड्या रद्द झाल्या आहेत तर काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत. पुणे आणि मिरजमार्गे काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत आणखी काही तासांनी कोकण रेल्वे मेगाब्लॉक घेणार आहे. आज दुपारी रत्नागिरी स्टेशनवर दादर सावंतवाडी गाडीतील प्रवाशांनी स्टेशन मास्तरला घेराव घालून आपला संताप व्यक्त केला. गणरायाच्या विसर्जनानंतर कोकण रेल्वे आम्हाला घरी सोडणार आहे का असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 2, 2011 04:45 PM IST

02 सप्टेंबर

कोकण रेल्वेचं विघ्न सरता सरेना...कोकण रेल्वे ट्रक आज ही मातीच्या ढिगा खाली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीतच आहे. अजूनही पोमेंडी ट्रॅकवर माती हटवण्याचं काम सुरू आहे. गाड्या उशिराने धावत आहे. एक ते दोन तासाने एक ट्रेन सोडण्यात येतेय आणि मग पुन्हा हे काम सुरू करण्यात येतंय. यापैकी काही गाड्या रद्द झाल्या आहेत तर काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत. पुणे आणि मिरजमार्गे काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत आणखी काही तासांनी कोकण रेल्वे मेगाब्लॉक घेणार आहे. आज दुपारी रत्नागिरी स्टेशनवर दादर सावंतवाडी गाडीतील प्रवाशांनी स्टेशन मास्तरला घेराव घालून आपला संताप व्यक्त केला. गणरायाच्या विसर्जनानंतर कोकण रेल्वे आम्हाला घरी सोडणार आहे का असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 2, 2011 04:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close