S M L

कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प

03 सप्टेंबरकोकण रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. आणि ही वाहतूक आज दिवसभर ठप्प राहणार आहे. तीन दिवसांपूर्वी संरक्षक भिंत खचल्याने पोमेंडीजवळच्या ट्रॅकवर आलेली माती हटवण्यात आली होती. पण ही माती पुन्हा पावसामुळे ट्रॅकवर आली आहे. त्यामुळे इथं ट्रॅकवर चिखल झाला आहे. प्रशासनाचे माती हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस सुरू असल्यानं अजूनही पोमेंडी ट्रॅकवर माती येतेच आहे. कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली आहे. पाच गाड्या वेगवेगळ्या स्टेशनवर थांबवण्यात आल्या आहेत.दरम्यान, प्रवाशांना रत्नागिरी स्टेशनवरुन अडवलीकडे एसटीच्या बसेसची सोय केली आहेत. अडवलीत थांबवण्यात आलेल्या ट्रेनमधून सिंधुदुर्गमध्ये पाठवण्यात येतंय. मात्र या सगळ्या प्रकारात प्रवाशांना घरच्या गणपतीला पोहोचायला पाच ते सहा तास उशीर होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2011 11:22 AM IST

कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प

03 सप्टेंबर

कोकण रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. आणि ही वाहतूक आज दिवसभर ठप्प राहणार आहे. तीन दिवसांपूर्वी संरक्षक भिंत खचल्याने पोमेंडीजवळच्या ट्रॅकवर आलेली माती हटवण्यात आली होती. पण ही माती पुन्हा पावसामुळे ट्रॅकवर आली आहे. त्यामुळे इथं ट्रॅकवर चिखल झाला आहे. प्रशासनाचे माती हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस सुरू असल्यानं अजूनही पोमेंडी ट्रॅकवर माती येतेच आहे. कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली आहे. पाच गाड्या वेगवेगळ्या स्टेशनवर थांबवण्यात आल्या आहेत.दरम्यान, प्रवाशांना रत्नागिरी स्टेशनवरुन अडवलीकडे एसटीच्या बसेसची सोय केली आहेत. अडवलीत थांबवण्यात आलेल्या ट्रेनमधून सिंधुदुर्गमध्ये पाठवण्यात येतंय. मात्र या सगळ्या प्रकारात प्रवाशांना घरच्या गणपतीला पोहोचायला पाच ते सहा तास उशीर होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2011 11:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close