S M L

शिवडीत भिंत कोसळून 5 ठार

03 सप्टेंबरमुंबईतील शिवडी येथे पावसामुळे भिंत कोसळून 5 जण ठार झाले आहे. मुंबईतील शिवडी भागातील खान प्रोसेस मिलच्या कंपाऊंडची ही भींत होती. घटनास्थळी फायर ब्रिगेडनं या ढिगार्‍या खाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या ढिगारी खाली आणखी काही जण अडकल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघात 5 मुलांचा मृत्यू झाला आहे. या पाच मुलांना केईएम हॉस्पिटलमध्ये नेत असतांनाच मृत्यू झाला.शिवडीत टीजे रोडजवळ खान प्रोसेस नावाची अनेक दिवसांपासून ती बंद होती. मात्र मिल बंद आहे असं कोणतीही सुचना येथे लावण्यात आली नव्हती. मिलच्या परिसरात खेळण्यासाठी आलेल्या मुलांवर कंपाऊंडची खचलेली भींत कोसळली. घटनास्थळी मुंबईच्या महापौर श्रध्दा जाधव यांनी भेट घेऊन घटनेचा आढावा घेतला . मात्र या घटनेला कोण जबाबदार आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2011 03:03 PM IST

शिवडीत भिंत कोसळून 5 ठार

03 सप्टेंबर

मुंबईतील शिवडी येथे पावसामुळे भिंत कोसळून 5 जण ठार झाले आहे. मुंबईतील शिवडी भागातील खान प्रोसेस मिलच्या कंपाऊंडची ही भींत होती. घटनास्थळी फायर ब्रिगेडनं या ढिगार्‍या खाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या ढिगारी खाली आणखी काही जण अडकल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघात 5 मुलांचा मृत्यू झाला आहे. या पाच मुलांना केईएम हॉस्पिटलमध्ये नेत असतांनाच मृत्यू झाला.

शिवडीत टीजे रोडजवळ खान प्रोसेस नावाची अनेक दिवसांपासून ती बंद होती. मात्र मिल बंद आहे असं कोणतीही सुचना येथे लावण्यात आली नव्हती. मिलच्या परिसरात खेळण्यासाठी आलेल्या मुलांवर कंपाऊंडची खचलेली भींत कोसळली. घटनास्थळी मुंबईच्या महापौर श्रध्दा जाधव यांनी भेट घेऊन घटनेचा आढावा घेतला . मात्र या घटनेला कोण जबाबदार आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2011 03:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close