S M L

सौमित्र सेन यांच्याविरोधात महाभियोग रद्द होण्याची शक्यता

04 सप्टेंबरकोलकाता हायकोर्टाचे न्यायाधीश सौमित्र सेन यांच्याविरोधात लोकसभेतला महाभियोग रद्द होण्याची शक्यता आहे. सौमित्र सेन यांनी पदाचा राजीनामा राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडे पाठवला होता. राष्ट्रपतींनी तो राजीनामा थोड्या वेळापूर्वीच स्वीकारला. 19 ऑगस्टला त्यांना राज्यसभेनं महाभियोग चालवून बडतर्फ केलं होतं...लोकसभेतही त्यांच्यावर महाभियोग चालणार होता. पण राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारल्याने महाभियोगाद्वारे बडतर्फ होणारे पहिले न्यायाधीश होण्याच्या ठपक्यापासून त्यांची सुटका होण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या निधीची अफरातफर केल्याचे आणि बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे आरोप सेन यांच्यावर आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 4, 2011 04:29 PM IST

सौमित्र सेन यांच्याविरोधात महाभियोग रद्द होण्याची शक्यता

04 सप्टेंबर

कोलकाता हायकोर्टाचे न्यायाधीश सौमित्र सेन यांच्याविरोधात लोकसभेतला महाभियोग रद्द होण्याची शक्यता आहे. सौमित्र सेन यांनी पदाचा राजीनामा राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडे पाठवला होता. राष्ट्रपतींनी तो राजीनामा थोड्या वेळापूर्वीच स्वीकारला. 19 ऑगस्टला त्यांना राज्यसभेनं महाभियोग चालवून बडतर्फ केलं होतं...लोकसभेतही त्यांच्यावर महाभियोग चालणार होता. पण राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारल्याने महाभियोगाद्वारे बडतर्फ होणारे पहिले न्यायाधीश होण्याच्या ठपक्यापासून त्यांची सुटका होण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या निधीची अफरातफर केल्याचे आणि बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे आरोप सेन यांच्यावर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2011 04:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close