S M L

दिग्विजय सिंगांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा - अण्णा हजारे

05 सप्टेंबरजेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या टीमच्या सदस्यांना हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे. अण्णांनी आपल्या सदस्यांची बाजू घेत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांच्यावर टीका केली आहे. दिग्विजय सिंग यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा असा सल्ला अण्णांनी सरकार दिला आहे. अण्णा आज राळेगणसिध्दीत पत्रकारांशी बोलत होते. मागील आठवड्यात अभिनेता ओम पुरी, किरण बेदी यांच्या पाठोपाठ प्रशांत भूषण यांनाही हक्कभंगाची नोटीस बजावली आहे. रामलीला मैदानावर अण्णांचे उपोषण सुरू असतांना व्यासपीठावरून खासदार, मंत्र्यांविरोधात अपशब्द वापरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी मी अण्णांचा हनुमान आहे असे म्हणणारे अरविंद केजरीवाल यांनाही हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच त्यांना इन्कम टॅक्स विभागाने ही 9 लाखांचा दंड ठोठावला आहे. आज राळेगणमध्ये मीडियाशी बोलतांना अण्णा म्हणाले की, केजरीवाल यांना आपण गेल्या काहीदिंवसापासून ओळखतो. केजरीवाल हे चारित्र जपणारे व्यक्ती आहे. कोणताही गैरप्रकार ते करू शकत नाही. घरदार सोडून सामाजिक कार्याचा वसा त्यांनी घेतला आहे. मी त्यांच्या घरी गेलो होतो. केजरीवाल घोटाळा करू शकत नाही असा विश्वास अण्णांनी व्यक्त केला आहे. पण सत्यकधी खोटे ठरू शकत नाही आणि सत्याचा कधी पराभव होऊ शकत नाही असं मत ही अण्णांनी व्यक्त केलं. अण्णांच्या आंदोलनात राष्ट्रीय सेवा संघ आणि भाजपच्या लोकांची गर्दी होती असं म्हणणार्‍या लोकांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा असा सल्लावजा टोला अण्णांनी पुन्हा सरकारला लगावला. मी कधीही कोणत्या आंदोलनासाठी राजकीय पक्षाच्या दारात गेलो नाही जी लोक पक्षाच्या दारात जातात त्यामागे त्यांचा काही स्वार्थ असतो पण मी माझ्या आयुष्यात कोणताही स्वार्थ ठेवला नाही असं मतही अण्णांनी व्यक्त केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 5, 2011 05:29 PM IST

दिग्विजय सिंगांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा - अण्णा हजारे

05 सप्टेंबर

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या टीमच्या सदस्यांना हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे. अण्णांनी आपल्या सदस्यांची बाजू घेत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांच्यावर टीका केली आहे. दिग्विजय सिंग यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा असा सल्ला अण्णांनी सरकार दिला आहे. अण्णा आज राळेगणसिध्दीत पत्रकारांशी बोलत होते.

मागील आठवड्यात अभिनेता ओम पुरी, किरण बेदी यांच्या पाठोपाठ प्रशांत भूषण यांनाही हक्कभंगाची नोटीस बजावली आहे. रामलीला मैदानावर अण्णांचे उपोषण सुरू असतांना व्यासपीठावरून खासदार, मंत्र्यांविरोधात अपशब्द वापरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी मी अण्णांचा हनुमान आहे असे म्हणणारे अरविंद केजरीवाल यांनाही हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच त्यांना इन्कम टॅक्स विभागाने ही 9 लाखांचा दंड ठोठावला आहे.

आज राळेगणमध्ये मीडियाशी बोलतांना अण्णा म्हणाले की, केजरीवाल यांना आपण गेल्या काहीदिंवसापासून ओळखतो. केजरीवाल हे चारित्र जपणारे व्यक्ती आहे. कोणताही गैरप्रकार ते करू शकत नाही. घरदार सोडून सामाजिक कार्याचा वसा त्यांनी घेतला आहे. मी त्यांच्या घरी गेलो होतो. केजरीवाल घोटाळा करू शकत नाही असा विश्वास अण्णांनी व्यक्त केला आहे. पण सत्यकधी खोटे ठरू शकत नाही आणि सत्याचा कधी पराभव होऊ शकत नाही असं मत ही अण्णांनी व्यक्त केलं.

अण्णांच्या आंदोलनात राष्ट्रीय सेवा संघ आणि भाजपच्या लोकांची गर्दी होती असं म्हणणार्‍या लोकांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा असा सल्लावजा टोला अण्णांनी पुन्हा सरकारला लगावला. मी कधीही कोणत्या आंदोलनासाठी राजकीय पक्षाच्या दारात गेलो नाही जी लोक पक्षाच्या दारात जातात त्यामागे त्यांचा काही स्वार्थ असतो पण मी माझ्या आयुष्यात कोणताही स्वार्थ ठेवला नाही असं मतही अण्णांनी व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2011 05:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close